संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती सभा संपन्न

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.

दि. ०८/०१/२०२५ रोजी जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित कण्यात आली होती.
सदर सभेमध्ये Humen Melapnenunovirus (HMPV) या आजाराविषयी उपाययोजना व राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचना अंमलात आणण्याकरीता आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ. संतोष चौधरी सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पालघर, डॉ. रामदास मराड जिल्हा शल्य चिकित्सक, शशिकांत साळुंके जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. संदिप निंबाळकर सहा-संचालक कुष्ठरोग, डॉ. अजय ठाकरे साथरोग अधिकारी, डॉ. अश्विनी राव जिल्हा हिवताप अधिकारी इ. तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख / प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
सभेमधे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी ICMR / WHO यांच्या सुचने प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या बरोबरीने सर्व विभागांनी HMPV या आजारा विषयी जिल्ह्यामध्ये जनजागृती करुन नागरिकांना घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट