भारतीय महिलांना योग करण्याची गरज : अॅड. मंजित कौर मतानी यांचे मत

उपसंपादक – रणजित मस्के
भंडारा :- आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाचे आयोजन दि. २१ जून २०२३ रोजी नटराज मेटलच्या मागे बन्सोड हॉस्पिटल जवळ, भोजापूर रोड पटांगणावर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक अँड. मंजित कौर मतानी, प्रमुख अतिथी विदर्भ समन्वयक आयएनओ दिल्ली तथा संचालक श्री संत गुलाब बाबा योग, प्राकृतिक चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्र भंडारा डॉ.भगवान मस्के, संस्थेचे प्राचार्य डॉ. सुलभा मस्के, संस्थेच्या योग शिक्षिका डॉ. वैशाली गिन्हेपुंजे, सामाजिक कार्यकर्ता अविनाश ब्राम्हणकर, समाज सेविका प्रिती ब्राम्हणकर, मंदाताई पडोळे, योग शिक्षिका जयश्री भुरे यांचे प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेविका प्रिती ब्राम्हणकर यांनी करून योग कार्यक्रमाच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन अँड. मंजित कौर मतानी यांनी योग शरीर सुदृढ राहण्यासाठी व जीवनशैली निरोगी राहण्यासाठी योगाचे फार महत्व आहे व विशेषकरून महिलांनी दररोज सकाळी उठून कमीत कमी २५ ते ३० मिनीटे नियमित योगाभ्यास करावा, असे मत व्यक्त केले. तसेच विदर्भ समन्वयक आयएनओ दिल्ली तथा योग प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. भगवान मस्के यांनी योग शास्त्र ही भारतीय संस्कृतीची जगास मिळालेली देणगी आहे. पुरातन काळापासून मानवी शरीर व मनाचे आरोग्य योग शास्त्राद्वारे कसे सांभाळले गेले आहे व महर्षी पतंजली हे योग शास्त्राचे प्रणेते असून पतंजली ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाद्वारे अष्टांग योगांचा मार्ग दाखविलेला आहे. त्यानुसार जगामध्ये दि. २१ जून २०१५ ला पहिला आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून ते आतापर्यंत नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करीत आहोत. योग केल्यामुळे माणसाला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी
किंवा रोग मुक्त होण्यासाठी असाध्य रोगावर मात करण्यासाठी योग फारच उपयोगी ठरलेला आहे. त्यामुळे सर्वांनी नियमित योग करावे, असे आवाहन केले आहे.
तसेच इतर उपस्थित मान्यवरांनी सुध्दा योगाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. त्यानंतर भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार योगासने घेण्यात आली. त्यामध्ये सुक्ष्म व्यायाम, शरीर संचालन क्रिया, दंड स्थितीतील आसने बैठक स्थितीतील आसने, शयन स्थितीतील आसने, विपरीत शयन स्थितीतील आसने, प्राणायाम, ध्यानधारणा व शेवटी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनाचा संकल्प करून प्रमुख अतिथी व साधकांचे आभार मानून तसेच उपस्थित योग । साधकांना प्रमाणपत्र वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन पूनम परमशहारे यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com


