भारतीय नौदलाने ९ सोमालियन चाच्यांना अटक करुन कारवाईसाठी मुंबई पोलीसांच्या दिले ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:– मासेमारी करणारे जहाजास हायजॅक करणाºया ९ सोमालियन चाच्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भारतीय नौदलाच्या अ‍ॅन्टी पायरेसी आॅपरेशनदरम्यान करण्यात आली. या कारवाईत चाच्यांकडून ९ मोबाईल फोन, ७२८ जिवंत काडतुसे, एके ४७ रायफलची, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. त्रिशुल या युध्दनौकेचे रेग्युलेटिंग आॅफिसर लेफ्टनंट अकितकुमार अवाल यांच्या तक्रारीनुसार, भारतीय नौदलाकडून समुद्रातून चालणारे व्यापारी जहाज व क्रू मेंबर्स यांची सुरक्षितते कामी नियमित गस्त करण्यात येत असते. २८ मार्च रोजी २२.५९ वाजता आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना हाय अलर्ट मिळाला. त्यानुसार इरानियन प्लॉग असलेले शिप नामे ए आय कम्बर या मासेमारी करणारे जहाजास हायजॅक केले आहे.

आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना खात्री झाली की सदरची मासेमारी करणारे जहाज हे पायरेट यांनी हायजॅक केले आहे.

आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा या इंडियन युध्द नौका खात्री केली असता सदर ठिकाण हे १०५ नॉटिकल मैल सोमालियाचे कोस्ट हद्दीत असत्याचे समजले. इंडियन युध्द नौकेवरील अधिकारी यांनी त्यांना वारंवार अनाउन्समेंट करून सांगितले की, तुम्ही जहाज थांबवा आणि ओलिस ठेवलेल्या इसमांना मुक्त करा अन्यथा आम्हाला तुमच्या विरुध्द कारवाई करावी लागेल. परंतु पायरेट काहीही ऐकून न घेता जहाज थांबवत नव्हते, सरेंडर करीत नव्हते. म्हणून आय.एन.एस. सुमेधा ही युद्धनौका १६ नंम्बर चॅनल मेरिटाईम मोबाईल ब्रॉडकास्टमार्फत त्यांना वॉरनिंग करीत होती. परंतु पायरेट त्याकडे दुलक्ष करीत होते.

त्यानंतर वारंवार दिलेल्या वॉरनिंग नंतर सोमालियन पायरेट यांनी ओलीस ठेवलेल्या कु मॅम्बरना ढाल बनवुन मासेमारीच्या डेकवर येवुन सरेंडर करीत आहे असा संदेश दिला त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेले अवैध्य अग्नीशस्त्रे पाण्यात टाकुन नाश केली त्यानंतर इंडियन युध्द नौकेवरील कमांडो हे ओलीस ठेवलेल्या मासेमारी जहाजावर उतरले आणि खात्री केली असता त्यामध्ये एकुण ९ सोमालियन चाच्या पायरेट होते तसेच ओलीस ठेवलेल्या मासेमारी जहाजावरील एकूण २३ कुमेंम्बर हे पाकिस्तानी नागरिक होते.

इंडियन युद्ध नौकेवरील कमांडो यांनी कु मैम्बरकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सोमालियन चाव्या पायरेट यांच्याकडे एके ४७ रायफल हॅन्डग्रेनेड व रॉकेट लॉन्चर होते आणि ते जबरदस्तीने त्यांच्या मासेमारी जहाजावर चढले आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवुन जर काही हलचाल केल्यास मारून टाकु अशी धमकी देत होते. त्यावेळी इंडियन कमांडो यांनी सदर मासेमारी जहाजाची पाहणी केली असता त्या जहाजावर एकुण ७२८ जिवंत काडतुसे एके ४७ रायफलची तसेच एक जीपीएस डिव्हाईस, ८ मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करून ताब्यात घेतले.

सोमालियन चाच्यांनी ताब्यात घेतलेली इरानियन देशावा प्लॅग असलेली मासेमारी बोट व त्यावरील २३ कु मेंम्बर यांचेकडे चौकशी करून त्यांना सोडुन दिले आणि एकुण ९ सोमालियन वाच्या पायरेट यांना कायदेशिर कारवाई करण्यासाठी आज दिनांक ०३/०४/२०२४ रोजी सकाळी १२.३० वाजता यलोगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आणि तशी वरील प्रमाणे लेखी तक्रार दिल्याने यलोगेट पोलीस ठाणेत गु.र.क्र. २०/२०२४, कलम ३६४(अ), ३६३, ३५३, ३४१, ३४२, ३४४, (जे) १२०(ब), १४३, १४५, १४७,१४८,१४९, ५०६ (२), ३४ भादवि सह मेरिटाईम अन्टी पायरसी अ‍ॅक्ट २०२२ कलम ३,५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५, २७ सह पासपोर्ट अधिनियम कलम ३,६ सह परकीय नागरी कायदा कलम १४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारतीय नौदलाचे युध्द नौका आय.एन.एस. त्रिशुल आणि सुमेधा यांनी अ‍ॅटी पायरेसी आॅपरेशन दरम्यान ९ सोमालियन समुद्री चाचे यांना अटक करण्यात आली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट