भारतीय शिल्प‌काराचे घवघवीत यश जागतिक नाणे संकल्पना स्पर्धेत सन्मानपदक..

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

मुंबई:– रत्नागिरीतील कातळशिल्पांची जागतिक दखल…

जपान मिंट दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेचे आयोजन करते. जगभरातील हजारो शिल्पकार यात सहभाग घेऊन विविध विषयावर आधारीत नाणे डिझाईन तयार करीत असतात. या स्पर्धेमध्ये या वर्षी (२०२३) मुंबई स्थित शिल्पकार प्राचार्य श्री. मुकेश दत्तात्रय पुरो यांच्या कोकणातील कातळशिल्पे ‘या विषयावर आधारीत नाणे संकल्पनेला fine work म्हणून सन्मान पदक घोषित झाले आहे.

यानिमित्ताने या कातळशिल्प वारश्याची जगाने दखल घेतली आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

श्री.मुकेश दत्तात्रय पुरो हे गिरगांव मधील ‘मुंबई कला महाविद्यालय’ चे प्राचार्य असून मुंबईच्या सर ज. जी. कला महाविद्यालयात त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे.

व्यक्ती- शिल्प ‘ या विषयात त्यांनी त्यांचे पदवृत्तर शिक्षण घेतले असले तरी ते कला जगतात ‘कला-इतिहास मास्तर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. सरांचा कला इतिहास अभ्यास दांडगा असून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले आहे..शिल्पकार, कला इतिहास अभ्यासक याबरोबरचं ते एक उत्तम त्रिमितीय (3D) रंगोळीकार म्हणूनही विख्यात आहेत. त्यांना मिळालेला हा सन्मान हा एका अर्थाने भारताचा व महाराष्ट्राचा बहुमान आहे. या निमित्ताने कोकणातील कातळ शिल्पांची, महती साता समिद्रापार पोहोचो ही आशा…!

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट