आय.पी. एल. क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे जालना शहरातील ४ इसमावर स्था.गु.शा. जालना यांची धडक कार्यवाही..!

0
WhatsApp Image 2025-03-27 at 6.43.18 PM (1)
Spread the love

जालना

सह संपादक- रणजित मस्के

जालना जिल्ह्सयात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावलाने व बुकीवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल यांनी सूचना दिल्या होत्या.

त्यावरुन मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना, श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस ठाणे सदर बाजार हद्यीत आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे व बुकी यांची माहीती काडुण ईसम नामे धवल किरीटकुमार शहा रा. सकलेचा नगर, व रोहीत शंकर क्षिरसागर रा. मोदीखाना जालना हे दोघे त्यांचे मोबाईल फोनवरुन व्हाटसअप अॅप व फोन कॉलवरुन बुको नामे सुभम मुदीराज, रोहीत गोयुक्षक यांचेकडे आयपीएल क्रिकेंट मॅच कोलकता विरुध्द राजेस्थान या क्रिक्रेट मंचवर ऑनलाईन सट्टा लावताना मिळुण आल्याने त्याचेकडुन 02 मोबाईल व नगदी रक्कम असा एकुण 40050/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, श्री.अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्वागुशा जालना, श्री. योगेश उबाळे, सपोनि, पोलीस अंमलदार सॅम्युअल कार्बळे, रामप्प्रसाद पव्हरे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे ने. स्थागुशा जालना यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट