विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते नंदुरबार येथे वाचनालयाचे उद्घाटन…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार: जिल्हयातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील आले होते याप्रसंगी तेथील पोलीस अधिकारी अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर
पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील अधिकारी, अमलदार व त्यांच्या पाल्यांना पोलीस ठाणे आवारातच पोलीस वाचनालय निर्माण करण्याबाबत सूचना प्रत्येक पोलीस ठाण्यात व्यायामशाळा, वाचनालय, पोलीस क्लब, पोलिसांचे ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी व विरंगुळासाठी वाचनालय उपलब्ध असावे, जेणेकरून पोलीस अधिकारी व अंमलदारांना फावल्या वेळेचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेता येईल हा यामागील उद्देश आहे.

त्याप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीसाना दिल्या होत्या .

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, बिसरखाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट