नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पाणपोईचा शुभारंभ…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या

संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकुण ३० ठिकाणी पाणपोई उभारण्यात येवून नागरिकांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँक कॉलनी, पोलीस ठाणे समोर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत रनाळा, आष्टा व कोरी नाका, उपनगर पोलीस ठाणे

गावात, नवापूर पोलीस ठाणे हदीत पोलीस ठाण्यासमोर अग्रवाल भवन व सामान्य रुग्णालय येथे विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत जामा मशिद जवळ, स्टेट बँक येथे, शहादा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर, बसस्थानक व जनता चौक येथे, सारंगखेडा पोलीस

गावात, भडगांव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व धडगांव गावात, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर, कोचरा माता मंदीर व साई हॉस्पीटलजवळ, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व खापर दूरक्षेत्र येथे, तळोदा पोलीस

ठाणे हद्दीत तहसील कार्यालयाजवळ, गव्हाण फाटा व बोरद येथे, मोलगी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे शहर वाहतूक शाखेसमोर असे एकुण- ३० ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत नंदुरबार जिल्ह्यात पाणपोई उभारण्यात आल्या आहेत.

हद्दीत काकाचा दावा जवळ, धानोरा ठाणे हदीत सारंगखेडा व वडाळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पाणपोईचे सर्वत्र कौतूक होत असून नागरिकांचा देखील या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी देखील जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय उपलब्ध करून दिली होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट