मुंबईत मायभूमी फाऊंडेशनचे उद्घाटन व भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन…

0
Spread the love

संपादक: दिप्ती भोगल

मुंबई: मायभूमी फाऊंडेशन मार्फत २६/०२/२०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत शिरोडकर हायस्कूल, के ई एम हॉस्पिटल शेजारी, परेल येथे *भव्य रक्तदान शिबिर व मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा आयोजित केलेला आहे तरी या दिवशी आपण सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदाते घेऊन उपस्थित राहून आपले सहकार्य कराल अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी अद्याप पर्यन्त रक्तदान केले नसेल त्यांनी सुधा रक्तदान करावे ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी आपली नावे वरील संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याकडे नोंदणी करावी.

मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर You Tube लाईव्ह दिसणार आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे गोर गरीब गरजू लोकांना जिवनदान मिळणार आहे. आपणास कल्पना आहेच की सरकारी दवाखान्यात वेळेला रक्त उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला हे रक्तदान शिबिर यशस्वी करायचे आहे.

ज्याच्यावर प्रसंग आला तो आज दुःख भोगतो आहे त्याच्या वेदना आणि दुःख त्यालाच कळते म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातील गरजु गरीब लोकांना मदत करण्यासाठी सज्ज होऊया. ज्यांना सेवेची संधी मिळाली नाही त्यांना सेवा करण्यासाठी परमेश्वराने संधी दिली आहे सेवा द्या सेवेकरी व्हा असे आव्हान मायभूमी फाऊंडेशन मार्फत करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट