सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथील नुतणीकरण केलेल्या बॅरेकचे उदघाटन तसेच विदयार्थ्याना स्पर्धा परिक्षा पुस्तके व शुज चे वितरण…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री . निखील पिंगळे,यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री.नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, श्री. विवेक पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .

सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव येथील जवानांच्या वास्तव्याकरीता असलेल्या बॅरेकचे बांधकाम हे अतिशय जुने असल्यामुळे बरेच ठिकाणी पडझड झालेली होती…. तसेच पावसाचे पाणी त्या ठिकाणी गळत होते… त्यामुळे पोलीस जवानांना बऱ्याच अडचणींना तोंड दयावे लागत होते. सदरची बाब ही पोलीस अधिक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ सदर बॅरेकचे दुरुस्ती व नुतणीकरण करण्याचे प्रस्ताव सादर करणेबाबत प्रभारी अधिकारी गोठणगाव यांना आदेशित केले…त्यानुसार तातडीने संपूर्ण बॅरेकची समीक्षा करून आवश्यक ती दुरुस्ती विदयुत फिटींग , रंगरंगोटी , दारे खिडक्या , पत्रे व सिलिंग इत्यादी कामांचे मुददेसुद प्रस्ताव मा . पोलीस अधिक्षक यांचे समक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्फतीने सादर करण्यात आलेला होता . सदर बाब अत्यावश्यक असल्याने प्रथम प्राधान्य देवून मा. पोलीस अधिक्षक यांनी मान्यता दिल्याने संपूर्ण नुतणीकरण करुन दिनांक १३ मार्च २०२४ रोजी सदर इमारतीचे उदघाटन गोंदिया जिल्हयाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आले.

AOP गोठणगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने तसेच दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी यांची गरज लक्षात घेवून रोटरी क्लब साउथ इस्ट नागपूर व जिवन आधार बहुददेशीय सामाजिक संस्था या NGO शी प्रभारी अधिकारी गोठणगाव तसेच प्रभारी अधिकारी भा.रा.ब. २ यांनी सतत पाठपुरावा करून शूज उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली . सदर विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देवून श्री. राजीव वरभे, अध्यक्ष रोटरी क्लब साउथ इस्ट नागपूर , तसेच श्री. जिवन जवंजाळ, संस्थापक अध्यक्ष जिवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था, यांनी एकूण १३५ विदयार्थी व प्रशिक्षणार्थी यांचेकरीता चांगल्या प्रतीचे स्पोर्ट्स शूज उपलब्ध करून दिले ज्याचे वितरण अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे हस्ते करण्यात आले… वितरण करतेवेळी मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही NGO चे अध्यक्ष यांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार मानलेत.. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांना सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगावच्या वतीने स्पर्धा परिक्षा पुस्तके वाटप करण्यात आली. सदर स्पोर्टस शूज प्राप्त झाल्यानंतर विदयार्थी अतिशय आनंदी होते… सर्व विदयार्थ्यांनी व प्रशिक्षणार्थी यांनी दोन्ही संस्थाचे आभार मानलेत . याप्रसंगी भरतीपूर्व प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देणारे AOP गोठणगावचे प्रशिक्षक पोलीस अंमलदार पो.शि. नागेश देवकर , पो. शि.रत्नशिल मेश्राम यांचा विशेष सत्कार मा. प्रमुख अतिथी यांचे हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिवन बहुददेशीय आधार संस्थेचे अध्यक्ष श्री जिवन जवंजाळ , रोटरी क्लब नागपूर साउथ इस्ट चे अध्यक्ष श्री राजीव वरभे , केशोरी पो.स्टे.चे सपोनि जोगदंड , देवरीचे सपोनि आनंद घाडगे गोठणगाव चे सरपंच श्री संजय ईश्वार हे हजर होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पो.उप.नि. श्री सुनिल चव्हाण , तर प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे यांनी व आभार प्रदर्शन पोउपनि शुभम नवले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.फौ. घोरमारे , पो.हवा. भोवते , मडावी , मिसार , थेर , पुराम , अविनाश कटरे , तुरकर , सुनिल राखडे , भारती पोलीस नाईक राऊत,नखाते व पो.शि. गभने, लिल्हारे , मेश्राम , देवकर यांनी परिश्रम घेतले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट