मा.गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत काशीगाव पोलीस ठाण्याचे उद्घाटन..

उपसंपादक-रणजित मस्के
भाईंदर :-मा.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्गत नवीन काशिगाव पो. ठाण्याचे उद्घाटन तसेच मिरा-भाईंदर, वसईविरार पोलीस दलासाठी वाहन लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले. त्यात त्यांनी १ ऑक्टोबर २०२० पासुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असुन आयुक्तालयांतर्गत सुरुवातीला १३ पोलीस ठाणे कार्यान्वित होते.
त्यावेळी ७ पोलीस ठाणी नव्याने निर्माण करणे प्रस्तावित होते. मागील ३ वर्षात अनुक्रमे आचोळे, मांडवी, पेल्हार, नायगांव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येवून आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आतापर्यंत १७ होती. आज पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पो. ठाण्याचे विभाजन करुन १८ व्या काशिगांव पोलीस ठाण्याचे उद्घाटन पार पडले. असे सांगीतले.
शासन आदेशाअन्वये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली असून सदर आदेशामध्येच काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नविन काशिगांय पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काशिगांव पोलीस ठाण्याची हद्दनिश्चितीबाबत शासनस्तरावर अधिसुचना निर्गमित होणेकामी पोलीस महासंचालक यांच्या मार्फतीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मंजुरी मिळून त्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. काशिगांव पोलीस ठाण्याची निर्मिती मुळे काशिमीरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून करण्यात येत असुन मुळ काशिमीरा पोलीस ठाण्याचे एकुण क्षेत्रफळ २९.९० चौ.कि.मी. होते. त्यापैकी सुमारे २० चौ. कि.मी. एवढे क्षेत्रफळ काशिगांव पोलीस ठाण्याकडे वर्ग झाले असुन काशिमीरा पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ९.९० चौ. कि. मी. एवढे आहे. सन-२०२३ मध्ये काशिमीरा पोलीस ठाणेत भाग १ ते ५ अंतर्गत दाखल गुन्हयांची संख्या ६२२, भाग ६ अंतर्गत १७० व भाग ३ अंतर्गत ५७ गुन्हे एवढी आहे. तसेच सन २०२३ मध्ये काशिमीरा पोलीस ठाणेस दाखल अदखलपात्र गुन्हयांची संख्या ३१७० एवढी आहे.
काशिगाव पोलीस ठाण्यामुळे काशिमीरा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी सुमारे ५० टक्के गुन्हयांचे विभाजन होईल व काशिमीरा पोलीस ठाण्यावरील ताण कमी झाल्यामुळे नागरीकांना किमान वेळेत चांगला प्रतिसाद देणे शक्य होईल.
पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीवेळी आयुक्तालयाकडे केवळ ६१ चारचाकी व ९९ दुचाकी वाहने उपलब्ध होती. जिल्हा नियोजन समिती ठाणे च पालघर यांचेकडून २०२१-२०२२ च २०२२-२०२३ या वर्षात ३३ चारचाकी व ८६ दुचाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. तसेच २०२३-२०२४ मध्ये ४८ चारचाकी वाहने प्राप्त झालेली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून सदर वाहनांकरीता निधी उपलब्ध झाल्याने सद्यस्थितीत गुन्हे प्रतिबंधासाठी आवश्यक गस्तीसाठी, महिला व बालकांविरुध्दचे गुन्हयांमध्ये तपासाकरीता, डायल-११२ प्रणालीमध्ये मदतीसाठी येणाऱ्या कॉल ला तात्काळ प्रतिसाद देणेकरीता, गुन्हयांचा तपासा व गुन्हेगारांचा शोध घेणेकरीता या वाहनांचा वापर होणार आहे. गुन्हे नियंत्रण, वाहतुक नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत या गोष्टींचा गुणात्मक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्हा नियोजन समिती यांचेकडून प्राप्त २,९८,२९,००० रुपये निधीमधुन एकूण २५ वाहने प्राप्त झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नुतन पोलीस स्टेशन उद्घाटन व पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पाण्डेय, मिरा भाईंदर वसई-विरार, पोलीस आयुक्तालय यांचे अभिनंदन केले.
तसेच ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, मिरा-भाईंदर विधानसभा सदस्या मा.श्रीमती गिता जैन, माजी आमदार मा. श्री. मुजफर हुसैन, मिरा-भाईंदर महानगरपालीका आयुक्त श्री. संजय काटकर हे काशिगाव पो. ठाण्याचे उदघाटन प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहीले.

तसेच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मा.श्री. मधुकर पाण्डेय, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्री. सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्री. जयंत बजबळे हे उपस्थित होते.
उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरीक, पत्रकार बांधव तसेच शांतता कमीटी, मोहल्ला कमीटी तसेच महिला समीती सदस्या हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ श्री. प्रकाश गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com