सन ,२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :- २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.


ऑनलाइन पद्धतीने तात्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
यावेळी उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com