सातारा पोलीस दल व निर्माण बहुउदेशिय विकास संस्था यांचे सयुक्त विद्यमाने बालस्नेही पोलीस ठाणेचे उद्घाटन…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– मा. श्री सुनिल फुलारी सो. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणे कराड उप विभागाचे सर्व प्रभारी अधिकारी व मा. अमोघमती करुना ट्रस्ट जर्मनी, सुचित्रा काटकर अध्यक्ष बाल कल्याण समिती सातारा, मा. वैशाली भांडवलकर संस्थापीका निर्माण बहुउद्देशिय विकास संस्था, मा. राजपाल परमार प्रतिनिधी जनपाल संस्था यांचे सयुक्त विद्यमाने आज दिनांक 23/02/2024 रोजी सांय 06.00 वाजता कराड शहर पोलीस ठाणेस येथे बालस्नेही पोलीस ठाणे कराड शहरचे उदघाटन समारंभ मा.श्री सुनिल फुलारी सो. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र यांचे हस्ते पार पडला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्रीमती वैशाली भांडवलकर यांनी केले. त्यांनी बोलताना बाल स्नेही पोलीस ठाणेचे महत्व पटवुन दिले. त्यांनतर मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा यांनी सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये पाहील्या टप्यात अ ग्रेड पोलीस ठाणेस बालस्नेही पोलीस ठाणे हि संकल्पना अमलात आणुन पुढील काही काळात सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हे बालस्नेही पोलीस ठाणे बनवु अशी गवाही दिली आहे. मा. श्री सुनिल फुलारी सो. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी पोलीस ठाणे आलेल्या सर्व बालक महिला तसेच जेष्ठ नागरीक याना पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आदराने व आपुलकीने वागणूक दिली पाहीजे तसेच सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार याना निर्माण बहुदेशिय संस्था यांचे वतीने आपले स्थरावर 03 तासाचे प्रशिक्षण देण्यात यावे असे सांगितले आहे.
त्यानंतर मा.श्री अमोल ठाकुर सो. उप विभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी सदर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नागरीक पत्रकार व निर्माण बहुदेशिय संस्था यांचे आभार मानून सदर कार्यक्रम संपन्न झालेचे सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com