ठाणे वहातूक पोलीस आयुक्तालयातर्फे 33 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे उद्घाटन…

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर वाहतूक शाखेतर्फे दिनांक ११ जानेवारी रोजी ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे उदघाटन झाले आहे.

यावर्षी प्रथमच हे उद्घाटन डिजिटली पद्धतीने करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या उपआयुक्तांसह माननीय श्री. दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त, माननीय श्री. अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे. माननीय श्री. अशोक मोराळे,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, माननीय श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग व माननीय श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग हे मान्यवर उपस्थित होते.


हे अभियान १७ जानेवारी २०२३ पर्यंत साजरे करण्यात येणार असून “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व सामान्य जनतेमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात, उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली.


या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते व सिने निर्माते श्री मंगेश देसाई तसेच “आई कुठे काय करते” या मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर उपस्थित होत्या.



या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक उप विभाग यांनी केले. श्री. मंदार धर्माधिकारी सहा. पोलीस आयुक्त यांच्या आभार प्रदर्शन व नंतर राष्ट्रगीताने या उदघाटन सोहळ्याची सांगता झाली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com