अलिबाग येथे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे १८ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा – २०२३ चे उद्घाटन…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

रायगड :

१८ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२३ चे उद्घाटन दिनांक १५/०७/२०२३ रोजी पोलीस मुख्यालय अलिबाग- रायगड येथील जंजीरा सभागृह येथे संपन्न झाले.

रायगड पोलीस दलातर्फे आयोजीत कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दिनांक १५/०७/२०२३ ते दिनांक १७/०७/२०२३ रोजी दरम्यान पार पडली जाणार असुन, सदर मेळाव्याकरीता १. Scientific Aid to Investigation, २. Anti Sobotage Check, ३. Police Photography, ४. Police Videography, ५. Computer Awareness, ६. Dog Squd Competion अशा मुख्य विषयांवर लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदरच्या स्पर्धा हया निपक्षपाती व्हाव्यात याकरीता सदर विषयांचे तज्ञांना सदर स्पर्धांचे परिक्षण करण्याकरीता पाचरण करण्यात आलेले आहे.

दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या कौशल्यवृध्दीसाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील पोलीस दलांचा तसेच केंद्रीय पोलीस संघटनांचा सहभाग असतो, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बक्षिस प्राप्त करणे ही अभिमानाची बाब असुन त्याचा सन्मान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलीस टिम मधील अधिकारी व अंमलदार आपआपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत असतात.

सदर मेळाव्याची प्राथमिक सुरुवात म्हणुन प्रत्येक राज्यांच्या अंतर्गत येणारे परिक्षेत्रांमध्ये अशा प्रमाणे परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या स्वरूपात विविध विषयांतील स्पर्धांचे आयोजन करून उत्कृष्ठ कामगिरी करणा-या स्पर्धकांची निवड करण्यात येते.

कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२३ दरम्यान परिक्षेत्रातील एकुण ५ जिल्हयांचे १५ पोलीस अधिकारी व ८१ पोलीस अंमलदार असे आपल्या स्वकौशल्याप्रमाणे स्पर्धेकरीता आपल्या जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. एकुण ६ स्पर्धा प्रकार व २४ उपप्रकारामध्ये प्रथम ३ येणा-या स्पर्धकांना सुवर्ण, रजत व कांस्य असे पारितोषीक प्रदान करण्यात येणार आहे व यामधूनच उत्कृष्ट कामगिरी करणा-या संघाची निवड करून सदर जिल्हयास “सर्व साधारण विजेतेपद ” देवुन सन्मानित करण्यात येईल.

सदर स्पर्धेकरीता कोकण परिक्षेत्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे ग्रामीण व पालघर अशा ५ जिल्हयांतील एकुण ९६ स्वर्धकांनी सहभाग घेतला असुन, सदर स्पर्धा निपक्षपाती व पारदर्शकपणे तथा खेळी-मेळीच्या वातावरणात शिस्तबध्द पध्दतीने पार पाडली जाईल याकडे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांनी वैयक्तीक लक्ष दिले आहे. तथा उदघाटना दरम्यान सर्व स्पर्धकांचे स्वागत करून स्वर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट