नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- दिनांक – 01/10/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे सप्टेंबर/2024 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार-
1) पो.हवा. श्री. संतोष हरीहर पाठक,
2) पो.हवा. श्री. निरंजन विठोबा भगत
यांना निरोप म्हणुन त्यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते……..सदर सत्कार समारंभ निरोप कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे शुभ हस्ते नियत वयोमनाने सेवानिवृत्त झालेले नमूद पोलीस अंमलदार यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटी, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृती चिन्ह, भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच त्यांना पुढील भावी आयुष्याच्या प्रवासात शूभेच्छा देण्यात आल्या.




सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, तसेच प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह.), श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यांचे कुटुंबीय कार्यालयातील पोलीस अधिकारी/अंमलदार , मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्रीमती नंदिनी चानपुरकर, पोहवा राजु डोंगरे, राजु वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com