“गाव तेथे ग्रंथालय” या उपक्रमाच्या माध्यमातून केशोरी पोलीस स्टेशन येथे “डिजीटल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्राचे” उद्घाटन व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🔹पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली, अतिसंवेदशील नक्षल प्रभावित भागातील जनतेच्या नवयुवक युवती, विद्यार्थी यांचे हिताकरीता विविध उपक्रम राबविले जात आहेत....

➖ त्याचाच एक भाग म्हणून केशोरी पोलीस स्टेशनच्या “गाव तेथे ग्रंथालय” या उपक्रमा अंतर्गत केशोरी पोलीस स्टेशन येथील वाचनालयात स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

➖ या अनुषंगाने आज दि.18/10/2023 रोजी पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या हस्ते वाचनालयात नविन "डिजीटल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्रा" चे उद्घाटन करण्यात आले.....तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नविन आवृतीच्या पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले...
सदरवेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना ठाणेदार केशोरी श्री. सोमनाथ कदम, यांनी मार्गदर्शन करून सदर वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करून, येणा-या स्पर्धा परिक्षा उत्तमरित्या पास करून शासनाच्या विविध विभागात सेवा द्यावी असे आवाहन केले. व तयार केलेल्या डिजीटल मार्गदर्शन केन्द्राच्या माध्यमातून अभ्यास करून यश संपादन करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले...
केशोरी पोलीस स्टेशनच्या "गाव तेथे ग्रंथालय" या उपक्रमा च्या माध्यमातून ठाणेदार सपोनि. श्री. सोमनाथ कदम, पोहवा. सुशिल रामटेके, पो.शि. नितीन डुंभरे हे नक्षलग्रस्त व अतीदुर्गम आदिवासी भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत असून नक्षल चळवळी पासून दूर होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे...
सदरचे उपक्रम मा. श्री. निखिल पिंगळे साहेब, पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर साहेब, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. संकेत देवळेकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ कदम, पोहवा. सुशिल रामटेके, पो.शि. नितीन डुंभरे यांनी यशस्वीरित्या राबविला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com