जिल्हा परिषद पालघर मध्ये उल्लास ॲप मधील नोंदणीला नवसाक्षरांचा उदंड प्रतिसाद…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-१३,२९८ नवसाक्षर बसले परीक्षेला.

अनुसूचित जमाती चा सर्वात जास्त सहभाग

केंद्रशासन पुरस्कृत “उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर जिल्ह्यात राबवणेत येत आहे.

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत
साक्षरता (वाचन लेखन) व संख्याज्ञान चाचणी या परीक्षेला नवसाक्षरांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून एकूण १३,२९८ निरक्षर व्यक्तींनी ही परीक्षा दिली आहे.यात ९५५३ महिला, ३७४५ पुरुष यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे या परीक्षेला जिल्ह्यातील अनुसूचित जमाती च्या व्यक्तींनी सर्वात जास्त एकूण १२,२२४ स्त्री आणि पुरुष यांनी सहभाग घेतला असून यात ३५ दिव्यांग व्यक्ती आहेत.

१५ वर्षांपासून तब्बल ९० वर्षापर्यंत च्या व्यक्तीने ही स्वयंस्फुर्तीने ही परीक्षा दिली.अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात ही परीक्षा संपन्न झाली.

उल्लास APP वर एकूण १६४७० असाक्षरांची दिनांक १६/३/२०२४ पर्यंत नोंदणी झाली.
साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी दिनांक १७ मार्च २०२४ रोजी ऑफलाईन पद्धतीने जिल्ह्यातील १३४७ शाळांमधून एकाच वेळी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत केंद्रशासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली.
गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर आणि भानुदास पालवे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला.

सदर परिक्षेसाठी चाचणी वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुण अशी एकूण १५० गुणांच्या या परीक्षेला ५१ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असून ५ गुण वाढीव देण्याची तरदुत आहे. NIOS (राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ) या बोर्ड मार्फत
ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ माध्यमातून परीक्षा देण्याची मुभा होती. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी एकूण पाच भागात पुस्तके उपलब्ध करून दिली होती. स्वयंसेवकांमार्फत परीक्षेत बसणाऱ्या नवसाक्षरांना यातील अभ्यासाचे धडे देण्यात आले होते. एका स्वयंसेवकाडून दहा निरक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली होती.त्यांची परीक्षेची प्राथमिक तयारीही त्यांनी करून घेतली होती. यापुढेही शाळाव्यवस्थापन समित्यांनी आपले शाळा तसेच गावाच्या परिसरातील १५ वर्षे व त्यापुढील निरक्षरांची उल्लास ॲपवर १००% नोंदणी करावी अशी माहिती शेषराव बडे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी दिली आहे.

शिकण्याची इच्छाशक्ती असलेल्या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट