आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहिजे-फरारी आरोपीस बेकायदेशीर विदेशी बनावटीचे पिस्टलासह केले अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ. दिपाली घाटे, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांचेकडुन ठाणे ग्रामीण जिल्हयात दाखल असलेल्या वेग-वेगळया गुन्हयातील पाहीजे-फरारी आरोपीतांना अटक करणेकामी तसेच अवैध धंद्यावर कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पाहिजे-फरारी पथकाची स्थापना कराण्यात करण्यात येवुन, त्याबाबत पथका मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्या. त्यानुसार श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी ठाणे ग्रामीण जिल्हयातील पाहीजे व फरारी आरोपी तसेच अवैध धंद्या बाबत माहीती मिळवुन कारवाई करणेकामी त्यांना मार्गदर्शन केले.
मा. वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणचे पाहिजे-फरारी पथकाव्दरे कल्याण ता. गु.रजि. क्र. । १४१/२०१९ भादविसह कलम ३०७,१४३,१४७,१४९ मधील पाहिजे आरोपीत नामे प्रकाश उर्फ पक्या नामदेव शिरसाठ रा. म्हारळगांव ता. कल्याण जि. ठाणे याचा शोध घेत असता सदर आरोपी हा आपले कब्जात विनापरवाना पिस्टल बाळगतो अशी गोपनिय माहिती सदर पथकाला मिळाली. प्राप्त गोपनीय माहीती अनुशंगाने पाहिजे आरोपीतांचा अधीक शोध घेतला असता वर नमुद पाहिजे आरोपी अमरधाम चौक, म्हाळरगांव ता. कल्याण जि. ठाणे येथे मिळुन आल्याने त्याला ताब्या घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात विनापरवाना २५,०००/- रु किंमतीचे एक विदेशी बनवटीचे पिस्टल तसेच ६,०००/- रु किंमतीचे ०२ जिवंत काडतुस मिळुन आले आहे. त्यानुशंगाने सदर आरोपीतां विरुध्द कल्याण ता. पोलीस स्टेशन गु. रजि. क्र २४२/२०२४ भारतीय शस्त्र अधि. १९५९ चे कलम ३, २५ सह म. पो. का. कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयांचा आधिक तपास कल्याण ता. पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी, श्रीमती डॉ. दिपाली घाटे, अधीक्षक पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण यांनी दिलेल्या आदेश व सुचना प्रमाणे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी/सागर पाटील, पोहवा/२२३६ धनाजी कडव, पोहवा /३१२९ भगवान सोनवणे, पोशि/२०४५ रवि राय यांचे पथकाने कौशल्यपुर्ण उल्लेखनिय कामगीरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com