लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा सज्ज..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-कसारा, वाशींद येथील अति संवेदनशील गावांमध्ये केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलाचा (CISF) रुट मार्च आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यतील ग्रामीण भागातील कसारा व वाशिद येथे केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलाचा (CISF) रुट मार्च काढण्यात आला. निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याचा संदेश या मार्चद्वारे पोलिसांनी दिला. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक कोल्हे, पोलीस निरीक्षक बारवे यांचया नेतृत्वाखाली कसारा, शिरोळ, बेछुक, याशाळा, वाशीद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाशींद बाजारपेठ, वाशींद पश्चिम खातीवली, सारमाळ अशा अतिसंवेदनशील गावांमध्ये केंद्रिय औदयोगिक सुरक्षा दला (CISF) व स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी रुट मार्च काढला.
या रुट मार्चमध्ये स्थानिक पोलीस प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, केंद्रिय औदयोगिक सुरक्षा दलाचे (CISF) ५० जवान सहभागी झाले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com