“शेअर मार्केट” मध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली प्रती महिना ७% दराने पैसे रिर्टन देतो असे आमिष दाखवून लोकांची करोडो रूपयांची फसवणुक करणारे दोघे गजाआड..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-आरोपी नामे – 1) किसन चंपालाल पांडे वय 21 वर्षे व 2) कन्हैया चंपालाल पांडे वय 24 वर्षे दोन्ही राहणार- बनिया मोहल्ला, आमगाव असे अटक करण्यात आलेल्या अरोपीतांची नावे असून यांनी प्रति महिना सात टक्के दराने पैसे रिर्टन देतो असे लोकांना आमिष दाखवून लोकांची करोडो रूपयांची फसवणुक केलेली आहे….
▶️ याबाबात थोड्क्यात हकीगत अशी आहे की, फिर्यादी नामे- चल्वुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या वय 58 वर्ष रा. आमगांव हयाने आरोपी नामे- किसन चंपालाल पांडे व कन्हैया चंपालाल पांडे दोन्ही रा. बनिया मोहल्ला आमगांव तालुका – आमगांव जिल्हा – गोंदिया हयानी फिर्यादी व ईतर साक्षीदार यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करुन त्यांना प्रति महिना आठ टक्के दराने परतावा (रिर्टन) देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांना पैसे देण्यास भाग पाडले…. फिर्यादी आणि सांक्षीदार यांच्याकडुन एकुण रक्कम 03 कोटी 19 लाख 75 हजार रुपये (3, 19, 75,000/- रू) घेवुन अप्रामाणिकपणे अपहार करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध क्र. – 235/2024 कलम 420, 418, 403,406, 120 (ब) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात तपासा दरम्यान सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे- 1) किसन चंपालाल पांडे वय 21 वर्ष व 2) कन्हैया चंपालाल पांडे वय 24 वर्ष यांना दिनांक- 13/06/2024 रोजी गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आलेली आहे.. आरोपीतांचे राहते घराची गुन्ह्याचे अनुषंगाने घरझडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळया व्यक्तीच्या व वेगवेगळया व्यवसायाच्या नावाने आरोपीतांनी 38 बँक खाती वेगवेगळया बँकेत उघडल्याची माहिती प्राप्त झालेली आहे… तसेच आरोपीच्या राहते घरातुन- 6 (एल.ई.डी.) टी. व्ही, एक लॅपटॉप, रोख रक्कम 65 हजार रुपये व एक नोटा मोजण्याची मोठी मशिन असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीतांनी वापरलेल्या बँक खात्याचे तपशील (स्टेटमेंट) चे अवलोकन केले असता त्यावर 45 कोटी रुपयांचे आर्थीक व्यवहार झाले असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
तसेच नमूद आरोपीतांनी मोठया प्रमाणात लोकांची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.. मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याच्या सखोल तपास सुरू आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगांव, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, प्रभारी अधिकारी आमगांव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, सहा. पोलीस निरीक्षक आसाराम चव्हाण आमगांव पोलीस ठाणे पो. हवा. लिखीराम दसरे, मपोहवा भावमिरी, मपोना छिपे, पो. शि. अशोक साबळे, विनोद उपराडे, भाऊराव कठाणे, असिम मन्यार यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com