सातारा शहर परिसरातील सावकारकी पोटी लहान मुलीस ओलीस ठेवणा-या ०३ जणांच्या टोळीस जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले तडीपार…
उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : सातारा शहर परिसरामध्ये सावकारी करणारे सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख १. संजय बचन बाबर, वय ५१ वर्षे, २. अश्विनी संजय चावर वय २८ वर्षे (टोळी सदस्य) दोन्ही रा. आमनेवाडा सदरबझार सातारा ता जि सातारा ३. संकेत दिनेश राजे, वय ३१ वर्षे, रा. भिमाबाई आंबेडकरनगर सदरबझार सातारा ता जि सातारा (टोळी सदस्य) यांना जिल्हयातून तडीपार करणेबाबचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता.
सदर प्रस्तावामध्ये यातील टोळीविरुद्ध दाखल असलेल्या सावकारीचे गुन्हयांमध्ये त्यांना अटक
करुन ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही.
याउपर त्यांनी सावकारकी पोटी लहान मुलीस ओलीस ठेवले
यावरुन त्यांना कायदयाचा कोणताच धाक राहीला नसल्याने त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होऊ
लागला होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाईची मागणी होत होती.
मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सातारा यांनी सदर टोळीवरील दाखल गुन्हयांची माहीती घेवुन तसेच त्यांचा जनसामान्यमध्ये होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख संजय चवन बाबर व त्याचे इतर ०२ साथीदारांना दोन वर्षा करीता सातारा जिल्हयातून हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.



नोव्हेंबर २०२२ पासुन ०३ उपद्रवी टोळयामधील ०९ इसमांना हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेवर हद्दपारीची तसेच मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, श्री बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पोकों केतन शिंदे, मपोकों अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com