जिल्हागस्ती दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गोवंश चोरी केलेले आरोपी स्था.गु.शा. जळगाव यांनी केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
जळगाव


दि.१५/०६/२०२५ रोजी २३.०० ते दि.१६/०६/२०२५ रोजीचे ०५.०० वाजे जिल्हागस्त पेट्रोलींग कामी श्री. संदीप पाटील, बरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव, त्यांचे सोबत श्रेपोउनि, अनिल जगन्नाथ जाधव, शासकिय वाहन चालक पोहेको। दर्शन हरी ढाकणे असे रवाना झाले होते. जिल्हागस्त दरम्यान भुसावळ उपविभागात पेट्रोलींग फिरल्यानंतर मुक्ताईनगर उपविभागात पेट्रोलींग फिरत असतांना अंतुली ते डोलारखेडा रोडने पेट्रोलींग करीत असतांन मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीतील कुंड गावात एक इनोव्हा कार मधून ४ लोक उत्तरुन दरोडा टाकण्याच्या तयारीत एका घराकडे जातांना दिसले, सदर इसमांना पोलीस वाहन दिसल्याने ते पुन्हा इनोव्हा कार मध्ये बसुन डोलारखेडा फाट्या मार्गे, नागपूर महामागे रोडने त्यांचे इनोव्हा कार भरधाव वेगाने पळून जातांना दिसले. त्यामुळे श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे शासकीय वाहना चालक पोहेको ढाकणे यांना सदर वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले, त्याप्रमाणे शासकिय वाहन चालक यांनी सदर इनोव्हा कारचा पाठलाग करीत असतांना वेळोवेळी त्यांना धांबण्याचा इशारा करीत होते. परंतु इनोव्हा कार चांबत नव्हती. सदर इनोव्हा कारचा पाठलाग करीत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता सदर इनोव्हा कार चालकाने शासकिय वाहनास कट मारुन जिबेठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव यांनी मलकापुर, नांदूरा, बुलढाणा, अकोला इत्यादी ठिकाणी कंट्रोल रुमला संपर्क करुन सदर वाहन थांबविण्याबाबत कळविले व ते स्वताः त्यांचे शासकिय वाहनाने पाठलाग करीत होते.
दि.१६/०६/२०२५ रोजी ०३.४० वाजेच्या सुमारोस रिधोरा ता. बाळापूर जि. अकोला शिवारात अकोला शहरातील डिव्होजन गस्तीचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी NHAI ऑफिस जवळ नागपूर- धुळे महामार्गावर ट्रक रोडवर आडव्या लावून नाकाबंदी केली असता सदर इनोव्हा कार तेथे हळू झाली व बंद पडली. पोलीस निरीक्षक, व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार अशांनी लागलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता इनोव्हा कार मध्ये मागे बसलेले ०३ आरोपी व ड्रायव्हर सिटचे बाजूस बसलेला १ इसम दरवाजे उघडून पळून जात असतांना जुने शहर पो.स्टे. पोउनि. रविंद्र करणकर, पोहेको प्रमोद शिंदे, पोको स्वप्नील पोधाडे यांनी पाठलाग केला असता ते पळून गेले. इनोव्हा कार चालक यांने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अंगावर आणून त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याने पो.निरी. श्री. संदीप पाटील यांना किरकोळ मुक्का मार लागला आहे. सदर इनोव्हा कार चालक अरबाज खान फिरोज खान वय २३ रा. खदान, हैदरपुरा, आलीम चोक, अकोला ता.जि. अकोला यांस जागीच ताब्यात घेतले. इनोव्हा कार क्र. एमएच ३१०/सीआर ४७२८ मध्ये त्यांना एक काळया रंगाचा चोरी केलेला बैल मिळून आला, तसेच सदर वाहनात ०१ चोरीचा बैल, ०१ तलवार, ०१ गुप्ती, ०१ चाकू, ०१ लोखंडी रॉड, ०२ दोर, कपडे मिळून आले असे दरोडा टाकण्यास लागणारे साहित्य व हत्यारे मिळून आले असून ते गुन्हयां कामी जुने शहर पोलीस स्टेशन अकोला जि. अकोला येथे पंचनामा करुन जप्त करण्यात आले आहे.
आरोपी १) अरबाज खान फिरोज खान वय २३ रा. खदान, हैदरपुरा, आलीम चौक, अकोला ता.नि. अकोला व त्याचे पाहिजे असलेले आरोपी २) सैय्यद फिरोन ऊर्फ अनडूल सैय्यद झहीर रा. अजुमपुरा, कसारखेडा ता.बाळापुर जि. अकोला, ३) अफजल सैय्यद पूर्ण नाव माहित नाही रा. काली घाणी पुरा बाळापूर जि. अकोला, ४) इमरान पूर्ण नाव माहित नाही, रा.विकुंड नदी कासारखेडा बाळापूर जि. अकोला, ५) तन्नु ऊर्फ तन्वीर पूर्ण नाव माहित नाही रा. काली घाणी बाळापूर जि. अकोला यांना
कुबा मशिद अकोट फाईल अकोल येथील राहणारा ६) अफरोज खान ऊर्फ अप्प्या असे आरोपी निष्पन्न करुन चांगली कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. कृष्णांत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चार्ज मुक्ताईनगर उपविभाग यांच्या मार्गदर्शन खाली श्री.संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोउनि. श्री. शरद बागल, श्रेपोउनि. अनिल जाधव, पोहेको दर्शन ढाकणे, सफौ रवि नरवाडे, पोहेकों/ सुनिल दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना/श्रीकृष्ण देशमुख, पोहेको भरत पाटील व जुने शहर पो.स्टे. अकोला जि. अकोला कडील पोउनि, रविंद्र करणकर, पोहेको/ प्रमोद शिंदे, पोकों/स्वप्नील पोधाडे यांनी चांगली कामगिरी केल्याचावत त्यांचे मा. पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी अभिनंदन केले आहे.