गोंदिया जिल्हा पोलीस दल व एच. डी. एफ. सी. बँक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ” संविधान दिनानिमित्त” रक्तदान शिबीराचे आयोजन.

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

    गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात नक्षल विरोधी  अभियान राबवित असतांना नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-पोलीस अंमलदार, तसेच मुंबई येथे आतंकी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी - अंमलदार, निष्पाप नागरिक यांच्या स्मृती प्रित्यर्थ लोककल्याण कार्यास सहकार्य  करण्याकरिता दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ सकाळी- 10.00 वाजता ते सायंकाळी 05.00 वाजता. पर्यंत जिल्ह्यात रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...

🎯 रक्तदान शिबीर कार्यक्रम स्थळे➖➡️👇
1) जयस्तंभ चौक जवळील वाहतुक शाखा गोंदिया
2) उप-मुख्यालय देवरी
3). पो.स्टे. आमगाव
4). पो.स्टे. सालेकसा
5). पो.स्टे. तिरोडा
6). पो.स्टे. अ/मोर

एच.डी.एफ.सी. बँक, गोंदिया यांच्या कडुन रक्तदान देणाऱ्यांना खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध राहणार आहेतः–

1) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याकरिता सर्व तांत्रिक उपकरणे, डॉक्टर, सहाय्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

2) रक्तदान देणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार, प्रतिष्ठीत व्यक्ति, तरुण तरुणी मंडळी व नागरिक यांना जर रक्ताची गरज भासली तर त्यांच्याकडुन एक वर्षाचे वैध डोनर कार्ड देण्यात येणार असुन एक वर्षापर्यंत रक्त पुरविणार आहेत…

3) पोलीस अधिकारी/अंमलदार प्रतिष्ठीत व्यक्ति, संपादक तरुण तरुणी मंडळी व नागरिकांचे कुटुंबीयांना रक्ताची गरज
भासल्यास दिलेल्या एक वर्षाच वैध डोनर कार्ड मध्ये सवलतीच्या दराने रक्त पुरविणार आहे….

4) रक्तदान शिबीराच्या दिवशी रक्तदान दात्यास नास्ता व स्विट तसेच गिफ्ट (ट्रॅव्हल बॅग) व सर्टिफिकेट देणार आहेत…

     गोंदिया जिल्हा  पोलीस दलातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होणार आहेत......... तथापि लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यक्ति, तरुण- तरुणी व इतर गणमान्य नागरिक यांनी मोठया संख्येने रक्तदान शिबीरात सहभागी होवुन सहकार्य करावे........असे गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट