चोरीस गेलेले सोन्याचे दागिने केशोरी पोलीसांनी तात्काळ फिर्यादी महीलेस परत मिळवून दिल्याबद्दल विभागात पोलीसांवर कौतुकांचा वर्षाव….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 27/10/2023 रोजी सौ. हर्शालु दिपक शहारे रा. करांडली यांचे राहते घरी सोन्याच्या दागीन्यांची चोरी झाली होती….. फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. केशोरी येथे अप क्रमांक 102/ 2023 कलम 380 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

केशोरी पोलीसांनी सदर गुन्ह्याचा उत्कृष्ठरीत्या तपास करुन स्थानीक गुन्हे शाखा गोंदियाचे मदतीने आरोपी- नामे प्रविन अशोक डेकाटे वय 28 वर्षे यास गुन्ह्यात अटक केली. आरोपी कडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले.

सदर दागीने हे फिर्यादीस परत मिळणे करीता केशोरी पोलिसांनी तात्काळ न्यायालयीन कार्यवाही पूर्ण केली.. मा. न्यायालय अर्जुनी/मोर यांनी सदर दागीने अर्जदारास परत करण्याचे आदेश दिल्याने आज ठाणेदार सोमनाथ कदम यांचे हस्ते सदर गुन्ह्यातील हस्तगत केलेले सोन्याचे दागीने

(1) 03 ग्रामचा सोन्याचा पदक असलेले एक मंगळसुत्र
(2) 2½ ग्रामची सोन्याची एक नथ
(3) 3.630 मि.ली. वजनाचे एक जोड सोन्याचा झुमके
(4) 01 ग्रॅम सोन्याचा डोरला असलेली गाठी असा
एकुण- 42,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अर्जदार फिर्यादीस परत करण्यात आले.

आपले दागिने परत मिळाल्याचे बघून फिर्यादी महिलेस आनंद अश्रू अनावर झाले. परिसरातील नागरिकांनी देखील केशोरी पोलीस स्टेशनच्या या कामगिरीचे खूप कौतुक केलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम, पोउपनि प्रताप बाजड, पोहवा उदेभान इंदुरकर, पोहवा प्रेमदास होळी, पोहवा कैलाश राऊत, पोना राहुल चिचमलकर यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट