नाशिक शहरात घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार व चोरीचे सोने, चांदी चे दागीने विकत घेणारा सराफ जेरबंद गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची धडक कामगिरी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नाशिक:- मा. पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर व सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांनी शहरातील घरफोडी चोरी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांस ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

सदर घरफोडी गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ चे वपोनि विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०१ चे अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत होते. नमुद गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोउनि / रविंद्र बागुल यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार शंकर शामराव कापसे हा सध्या कारागृहातून सुटला असुन त्याने नाशिक शहरामध्ये अनेक घरफोडी चोरीचे गुन्हे केलेले आहेत व तो सध्या गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक रोड या भागात फिरत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ सो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / नाझीम पठाण, प्रविण वाघमारे, संदिप भांड, पो.ना. प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, आप्पा पानवळ, आण्णासाहेब गुंजाळ अशांनी त्यास शिताफीने पकडुन ताब्यात घेण्यात येवुन त्याचेकडे गुन्हयाचे कौशल्य वापरून विचारपुस केली असता त्याने सर्व प्रथम आडगाव पोलीस ठाणेस गु.र.नं. १०७/२०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयाची कबुली दिली त्यावर मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे यांचे आदेशान्वये सदरचा गुन्हा सपोउनि / रविंद्र बागुल यांनी तपासावर घेतला.

त्यानंतर सदर गुन्हयात नमुद आरोपीस अटक करून युनिट ०१ च्या पथकाने त्याचे कडे अधिक चौकशी करता त्याने नाशिक शहरातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, नाशिक रोड, मुंबईनाका या परिसरात देखील त्याचे साथीदारांसह घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले. व सदर गुन्हयात चोरी केलेले सोने व चांदीचे दागीने तुषार चंद्रकांत शहाणे या सराफास विक्री केल्याची कबुली दिली आहे. यावर तुषार चंद्रकांत शहाणे याचे कडे चौकशी करता त्याने नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे माहीत असुनही त्याचे कडुन वेळोवेळी चोरीचे सोने विकत घेतल्याचे निष्पन्न झालेने त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे. व त्याचे कडुन एकुण १८० ग्रॅम वजनाच्या सोने व ०२ किलो चांदी चा मुददेमाल, असा एकूण किंमत रुपये १२,१८,०००/- चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडुन तपासात खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) आडगाव पो. स्टे येथे गुरनं. १०७/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे २) पंचवटी पो. स्टे येथे गुरनं. १८४ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ३) म्हसरूळ पो. स्टे येथे गुरनं. २१ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ४) गंगापुर पो. स्टे येथे गुरनं. ०१ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ५) गंगापुर पो. स्टे येथे गुरनं. १४५ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ६) मुंबई नाका पो. स्टे येथे गुरनं. ५५ / २०२३ भादवि कलम ४५४, ३८० प्रमाणे (७) इंदिरानगर पो. स्टे येथे गुरनं. १४ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ८) इंदिरानगर पो. स्टे येथे गुरनं. २०८/२०२२ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ९) नाशिकरोड पो. स्टे येथे गुरनं. १० / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे १०) नाशिक रोड पो. स्टे येथे गुरनं. १६९ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे ११) नाशिक रोड पो. स्टे येथे गुरनं. १३७ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे असे गुन्हे उघडकीस आलेले असुन त्यांचे कडुन वर नमुद गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल ही हस्तगत झाला आहे.

सदर आरोपीतांची दि. २५/०७/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन पुढील तपास सपोउनि / रविंद्र बागुल गुन्हेशाखा युनिट ०१ हे करीत आहेत. आरोपी शंकर कापसे याचे वर २५ च्या वर घरफोडी चोरीचे गुन्हे व आरोपी तुषार शहाणे याचे वर यापुर्वी ०१ गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिन्दे, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वपोनि / विजय ढमाळ सो. सपोनिरी./ हेमंत तोडकर, पोउनि / विष्णु उगले, श्रीवंत, सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, शरद सोनवणे, संदिप भांड, पो. ना. / प्रशांत मरकड, महेश साळुंके, विशाल काठे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, चालक आण्णासाहेब गुंजाळ अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट