मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया यांनी घरफोडीच्या गुन्हेगारास ठोठावली 5 वर्षे सश्रम कारावास व 1000/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा…
उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आरोपी नामे – खन्ना राजकुमार कुमार वय 27 वर्ष, रा. दसखोली, गोंदिया यानी दिनांक 03/11/ 2016 रोजीचे रात्र दरम्यान फिर्यादी श्री. नरेश आसनदास भक्तानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया यांचे लोहा लाईन गंज बाजार गोंदिया येथील किराणा दुकाणाचे शटरचे ताले तोडुन दुकानामधिल १) होम थियटर २) काजु, बदाम, बारीक सुपारी, खारीक ३) एक दोन व पाचचे सिक्के असा एकुण 6000/- रु. चा माल चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्रमांक- 216 / 2016 कलम 457, 380 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
▪️सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीचा शोध घेवून गुन्ह्यात आरोपी नामे-
1) खन्ना राजकुमार कुमार रा. दसखोली गोंदिया,
2) योगेश गोविंदराव उगेमुगे वय 30 वर्ष, रा. मरघट रोड गोंदिया
यांना अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीतांविरुध्द सबळ साक्षपुरावे गोळा करून दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया, येथे सादर करुन फौजदारी खटला क्रमांक 21/2017 प्रमाणे चालविण्यात आला.
सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी योगेश गोविंदराव उगेमुगे वय 30 वर्ष, रा. मरघट रोड गोंदिया यास मा. न्यायालयाने या पुर्वीच शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी नामे- खन्ना राजकुमार कुमार, वय 27 वर्ष, रा. दसखोली, गोंदिया हा बरेच दिवसा पासुन फरार होता तो मिळुन आल्यानंतर मा. न्यायालय समक्ष पेश करण्यात आले. खन्ना राजकुमार कुमार याचे विरूध्द मा. न्यायालयात सबळ साक्षपुराव्या वरून दोषसिध्द झाल्याने आज दिनांक 07/08/2023 रोजी आरोपी यास मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया, यांनी
5 वर्ष सश्रम कारावास व 10000/-रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे.
घरफोडी गुन्हेगार आरोपी नामे - खन्ना राजकुमार कुमार, वय 27 वर्ष, रा. दसखोली, गोंदिया याचेविरुध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अनेक गुन्हे नोंद आहेत. सदर शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पोलीस उप- निरीक्षक, मिलींद नवगिरे यांनी केला असून खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता श्री. मुकेश बोरीकर यांनी केले तर न्यायालयीन कामकाज पो.हवा. ओमराज जामकाटे ,पोशि. किरसान यांनी पाहिले.
सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपासाबाबत मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. सुनिल ताजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपास करणारे अधिकारी, तपास कामात तसेच न्यायलायीन प्रक्रियेत मदत करणारे सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com