मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया, यांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अवघ्या दीड महिन्यात ठोठावली 7 वर्षे सश्रम कारावासाची आणि 1000/- रुपये द्रव्य दंडाची शिक्षा…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक – 31/05/2023 रोजी फिर्यादी दिपक छगनलाल हरिणखेडे, रा. वार्ड नं. 3 माता मंदिर जवळ रावणवाडी, व्यवसाय- अटर्णी हे नेहमी प्रमाणे कोर्टात आपले अटर्णी चे काम करीत असताना आरोपी नामे – निरज उर्फ पिंटु अनेशकुमार श्रीवास्तव वय 35 वर्ष, रा. गोविंदपुर गोंदिया हा त्या ठिकाणी आला व त्याचे कमरेला लावलेला कव्हर असलेला चाकु बाहेर काढुन फिर्यादी यांना धाक दाखवून 2000/- रु. व मोबाईल हिसकावून घेतला, फिर्यादी यांनी त्यास मोबाईल व 2000/- रु. परत करण्या ची विनंती केली असता त्याने फिर्यादीच्या कानावर चाकुच्या कव्हरने मारुन दुखापत केली व सर्व जज यांना मारणार असे बोलत तो सायकल स्टैंड कडे निघुन गेला, त्या वेळी कोर्ट परीसरात हजर असलेले वकील व गेटवरील पोलीस यांना माहिती दिली गेटवरील पोलीसाने पिंटु श्रीवास्तव कडे जावून चाकु काढुन घेतला तेवढ्यातच पिंटु श्रीवास्तव हा फिर्यादीचा मोबाईल तिथेच फेकुन पळुन गेला असे फिर्यादीचे तक्रारीवरून आरोपी निरज श्रीवास्तव वय 35 वर्ष, रा. गोविंदपुर गोंदिया याचे विरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाणे गोंदिया येथे अपराध क्रमांक 360/ 2023 कलम 394 भादंवि स सहकलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपास करण्यात आला.

गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे -निरज उर्फ पिंटु अनेशकुमार श्रीवास्तव वय 35 वर्ष, रा. गोविंदपुर गोंदिया यास अटक करुन गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेले 2000/- रु. व गुन्ह्यात वापरलेला चाकु हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपी विरुध्द भक्कम साक्ष पुरावे गोळा करुन दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया, येथे सादर करुन फौजदारी खटला क्रमांक 243/2023 प्रमाणे खटला चालविण्यात आला.
सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी निरज उर्फ पिंटु अनेशकुमार श्रीवास्तव वय 35 वर्ष, रा. गोविंदपुर गोंदिया याचे विरूध्द सबळ साक्ष पुराव्या वरून दोषसिध्द झाल्याने आज दिनांक 24/07/2023 रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, श्री. अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया, यांनी आरोपीस 7 वर्ष सश्रम कारावास व 1000/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आरोपी निरज उर्फ पिंटु अनेशकुमार श्रीवास्तव वय 35 वर्ष, रा. गोविंदपुर गोंदिया, याचे विरुध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अनेक गुन्हे नोंद आहेत. शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागर पाटील यांनी केला आहे. तर खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता श्री. मुकेश बोरीकर यांनी केले असून न्यायालयीन कामकाज पो.हवा. ओमराज जामकाटे ,पोशि किरसान यांनी पाहिले.
उत्कृष्ट तपासाबाबत मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. सुनिल ताजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com