महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून ठोठावली 4 वर्षे साधा व 1 वर्षे सश्रम कारावासाची व 12,000/- रूपये द्रव्यदंडाची शिक्षा..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-⏩ याबाबत थोडक्यांत हकीगत अशी की, आरोपी नामे -हेमराज उर्फ हेमु ब्रिजलाल वाधवानी, वय 58 वर्ष, रा. हरीकाशी नगर, माताटोली गोंदिया, यानी दिनांक- 17/10/2021 रोजी चे 11/45 वाजता दरम्यान महिला फिर्यादी ही एकटी असल्याचा फायदा घेवून फिर्यादीचे मनात लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याचे महिला फिर्यादीचे तक्रारी वरुन पो. स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक- 760/2021 कलम 354, 354(अ), भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यांचा तपास करण्यात आला…
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी हेमराज उर्फ हेमु ब्रिजलाल वाधवानी, वय 58 वर्ष, रा. हरीकाशी नगर, माताटोली गोंदिया, यास अटक करुन सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले, तपासी अधिकारी यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन तपासाअंती आरोपीविरुध्द दोषारोपपत्र मा.मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे सादर करुन मा. न्यायालयात फौजदारी खटला केस क्रमांक- 504/2021 प्रमाणे खटला चालविण्यात आला..
मा. न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने आज दिनांक 10/07/2024 रोजी मा. मुख्य. न्यायदंडाधिकारी,न्यायालय गोंदिया श्री. अभिजित कुलकर्णी साहेब, यांनी आरोपीस 4 वर्ष साधा कारावास, 1 वर्ष, सश्रम कारावास व 12,000/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे…
सदर शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार पो. स्टे. गोंदिया शहर यांनी केलेला असून मा. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सदर खटल्याचे बाजू….युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता श्री. कमलेश दिवेवार यांनी केले आहे ….तसेच न्यायालयीन कोर्ट पैरवी कामकाज पो.हवा. ओमराज जामकाटे पोशि. किरसान यांनी केले आहे..
मा. वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचे केलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत तपासी अधिकारी, तपास कामात मदत करणारे, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे सहा. सरकारी अभियोक्ता असे सर्वांचे अभिनंदन कौतुक केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com