जबरी चोरी प्रकरणी एका इसमास सातारा पोलिसांनी अटक करुन ३,७५,०००/- चा मुद्देमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : दिनांक २१/०२/२०२३ रोजी रात्री ९.३० वा.चे. सुमा बाँम्बे रेस्टॉरंट ब्रीज ते कोल्हापूर कडे जाणारे सव्र्हस रोडवर एका इसमाने बंदुकीचा धाक दाखवुन तक्रारदार नामे नवनाथ नामदेव भुजबळ यांचे ताब्यातील महिन्द्रा कंपनीची स्कार्पिओ कार क्र. एम.एच. १० एयु १४४१ ही जबरदस्तीने चोरी करुन नेहली होती. सदर बाबत सातारा शहर पोलीस ठाणेस गु.र.नं. १७९ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपअधिक्षक साो, गणेश किंद्रे, यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर, यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी श्री. एस. बी. मोरे व डीबी | पथकातील कर्मचारी यांनी ढालगाव ता. कवठेमहाकांळ जि.सांगली येथुन एका इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडून जबरदस्तीने चोरी केलेली ३,००,०००/- रुपये किमतीची महिन्द्रा कंपनीची कार क्र. एम. एच. १० एयु १४४१ व ७५,०००/- रुपये कि. मोबाईल फोन सह ३,७५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्री. बापू बांगर, मा. पोलीसउपअधिक्षक साो, गणेश किंद्रे, मा. पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे णे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट