आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेकडून पडघा पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडून गावठी कट्टा हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर मा. श्री. डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ. दिपाली घाटे, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी ठाणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे / विक्री / वाहतुक करणा-या इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिल्या त्यानुसार श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी ठाणे ग्रामीण जिल्हयातील अवैध धंद्ये तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे बाबत माहीती मिळवुन कारवाई करणेकामी वेग-वेगळे पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले.

मा. वरीष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणचे भिवंडी युनिटचे पथकाने गोपनीय माहीती प्राप्त करुन पडघा पोलीस ठाणे हद्दीत दि.१६/०४/२०२४ रोजी २०:२० वा. चे सुमारास मौजे मुंबई-नाशिक वाहीनीवरील नाशिक कडे जाणा-या वाहीनीलगत असणा-या राजधानी ढाब्याजवळ आर. के. स्नॅक्स समोर ता. भिवंडी जि. ठाणे येथे इसम नामे साईनाथ जगन सवर वय ३५ वर्षे, रा. पाली ता. भिवंडी जि. ठाणे याचे ताब्यातुन १०,०००/- रु किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा असे विनापरवाना, बेकायदेशीर रित्या आपले कब्जात जवळ बाळगले असतांना मिळून आला तसेच त्याने मा. जिल्हाधिकारी सो, ठाणे यांनी पारीत केलेल्या मनाई आदेशाची अवज्ञा केली म्हणुन त्यास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी पडघा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी, श्रीमती डॉ. दिपाली घाटे, अधीक्षक पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण यांनी दिलेल्या आदेश व सुचना प्रमाणे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजकुमार पोवार, पोहवा/२७६ हनुमान गायकर, पोहवा /१५४२ उमेश ठाकरे, पोहवा/४८८ सुहास सोनवणे, पोना/३२१२ योगेश शेळकंदे, पोना/१७२१ जितेंद्र वारके यांचे पथकाने कौशल्यपुर्ण उल्लेखनिय कामगीरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट