सातारा जिल्हयातील मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार…
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– सातारा जिल्हयामध्ये मेदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख
१) प्रेम ऊर्फ बबलु विलास पार्ट, वय २४ वर्षे,
२) गणेश विष्णु शिंदे, वय २३ वर्षे, ३) सनि विकास कासुडे, वय २२ वर्षे,
४) राहुल रामा कुहाडे, वय २५ वर्षे, सर्व रा. मेढा, ता जावली जि.सातारा, पांचेवर गर्दीमारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोचवणे, अवैद्य दारुची चोरटी विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष तासगांवकर, सहा. पोलीस निरीक्षक, मंदा पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेचाबतचा प्रस्ताय हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री.वी. वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली
होती.




सदर टोळीतील इसमांचेचर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेचर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृतीत कोणताही बदल झाला नाही, ते मेडा परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे मेढा तसंच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस मा.समीर रोख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा पांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५९ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २३ उपद्रवी टोळयांमधील ७५ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे १९
इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण १६ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पदराच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देयकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो. हया प्रमोद सावंत, अमित मपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, मेडा पोलीस ठाणेचे पो.ना.
महेश शिदे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com