डोंबिवलीतील रीक्षा चालकाने 5 तोळे सोन्याची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबाबत स.पोलीस आयुक्त श्री. धर्माधिकारी कल्याण वहातूक तर्फे विशेष अभिनंदन…

उपसंपादक- रणजित मस्के
डोंबिवली: डोंबिवली पश्चिम येथिल प्रवासी दिपाली राजपुत या दि.02/01/23 रोजी दुपारी 2.30 वा. चे सुमारास श्रम-साफल्य बंगला ते डोबिवली स्टेशन मछ्चिमार्केट असा प्रवास करत होत्या.

रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बँग रिक्षामध्ये राहीली आहे. त्यावेळी त्यांनी ताबडतोब रिक्षा स्टँण्डवर येऊन चौकशी केली. तेव्हा महात्मा फुले रोड रिक्षा स्टँण्डवरील रिक्षा चालक श्री संतोष राणे, रिक्षा क्र. MH 05 DL 4185 यांनी त्यांच्या रिक्षामध्ये शोध घेतला असता प्रवाशांची ५ तोळ्याचे दागिने असलेली बँग सापडली. त्यांनी ती बँग प्रामाणिकपणे प्रवासी महिला यांना संपुर्ण दागिन्यासह परत केली.

या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षा चालक श्री संतोष राणे यांचे मा.श्री मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com