पोलादपूरात भर रात्री तांबे ,पितळेची भांडी चोरांचा सुळसुळाट…

उपसंपादक-राकेश देशमुख
पोलादपूर:
श्री. अशिश अनिल महाकाळ यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २ सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान रात्री मौजे धारवली, ता. पोलादपूर, जि.रायगड यांच्या रहात्या घरी संशयीत आरोपी विवेक धनंजय सकपाळ आणि सचिन भगवान गमरे दोन्ही रहाणार बौद्धवाडी , धारवली यानी अशिश सकपाळ यांच्या घराची कौले काढुन घरात प्रवेश करुन 8 तांब्याचे हंडे,1 पितळेची टाकी,१ पितळेचे पातेले आणि 4 तांब्याचे तांबे असे एकुण 6190 /- किमतीचा मुद्देमाल अशिश यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरुन नेला.
आरोपी विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक श्री. म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय दंड विधान कलम 380,454,457,34 अन्वये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक श्री. घुले करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com