पालघर मध्ये वाहनधारकांना अनपेड ई-चलन दंड दिनांक २ मार्च २०२४ पर्यंत भरण्याचे जिल्हा वाहतुक शाखेतर्फे आव्हान…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– दिनांक ०३/०३/२०२४ रोजी लोकअदालत असल्याने पालघर जिल्ह्यातील अनपेड ई-चलान वाहनधारकांनी ०२/०३/२०२४ रोजीपर्यंत दंड भरणे बाबत वाहन चालकांना याद्वारे असे आवाहन करण्यात येते की, राज्यात महाराष्ट्र शासनाचा ” वन स्टेट वन इ-चलान ” माहे एप्रिल २०१९ पासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या असून वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियमाचे उल्लंघन करणारे वाहनधारक चालकांवर ई-चलन प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील आजपर्यंत दंड न भरलेल्या वाहनधारक यांचे अनपेड ई-चलनाची संख्या जास्त प्रमाणात असून सदरची अनपेड ई- चलनाची रक्कम हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. सदर ई- चलन प्रणालीद्वारे कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकांना एसएमएस संदेशद्वारे सदर चलनाची तडजोड रक्कम भरणेबाबत सूचना देण्यात येतात.

परंतु बऱ्याच वाहनधारकाने अद्यापपावेतो अनपेड इ-चलान तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही. अशा अनपेड इ-चलान वाहन धारकांनी दिनांक.०३/०३/२०२४ रोजी लोकअदालत असल्याने खालील नमूद ठिकाणी अनपेड इ-चलान तडजोड रकमेच्या भरणा करू शकतात. तडजोड रकमेचा भरणा केल्यास लोक अदालतमध्ये हजर राहण्याची आवश्यकता नाही.

वाहतूक अंमलदार यांच्याकडे खालील नमूद ठिकाणी ई,-चलान डिवाइसद्वारे अनपेड रक्कम भरू शकता. • ( पालघर वाहतूक शाखा रेल्वे स्टेशन चौकी,चाररस्ता, पाचबत्ती,) •( बोईसर रेल्वे स्टेशन चौकी,मधुरनाका, ओसवाल नाका,) • ( कासा चारोटी कोस्टल चौकी,) • ( तलासरी नाका चौकी, आर टी ओ, चेक पोस्ट,) • ( वाडा खंडेश्वरी नाका, कुडूस चौकी,) • डहाणू सागर नाका,मल्हार नका,) •( सफाळा रेल्वे फाटक सफाळा पूर्व,) तसेच वाणगाव,घोलवड, जव्हार,विक्रमगड, मोखाडा,या भागातील वाहतूक अमलदार यांच्याकडे ई-चलान डीवाईसद्वारे अनपेड रक्कम भरू शकता. तरी वरीलप्रकारे आपले वाहनावरील अनपेड इ-चलान तडजोड रक्कम ही दिनांक.०३/०३/२०२४ रोजी होणाऱ्या लोक अदालत पूर्वी भरावी.

आपले वाहनांवरील अनपेड ई- चलान तडजोड रक्कम भरल्यानंतर त्याची रीतसर पावती घ्यावी. तरी वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे पालघर जिल्हा वाहतूक शाखेकडून आवाहन करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट