महाड मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे महाड विधानसभेतील निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आमदार भरत गोगावलेंच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड विधानसभेत दिनांक 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल २० डिसेंबर रोजी लागले.यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सत्कार समारंभ महाड मधील वीरेश्वर मंदिराच्या प्रांगणात पार पडला.
महाड विधानसभेतील ग्रामपंचायत निवडणुकीत १०४ पैकी ६८ जागा मिळवत आमदार गोगावले यांनी आपला विधानसभेत असलेला दबदबा पुन्हा दाखवून दिला.विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तिन-चार पक्ष एकत्र येऊन सुद्धा आमदार गोगावलेंचा विजयरथ थांबवू शकले नाही.जवळ येवू घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पंचायती वर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आमदार गोगावलेंनी उपस्थित सरपंच,सदस्य व कार्यकर्यांना सांगितले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com