महाड येथे तालुका विधी सेवा समिती पोलादपूर व वकील संघटना महाड यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :-आज दि.12/08/2024 रोजी 09:30 ते 11:00 वाजण्याचे दरम्यान इंटरनॅशनल यूथ डे च्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती व पोलादपूर जिल्हा रायगड व वकील संघटना महाड यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आयोजन हिरवळ कॉलेज येथे करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतुक नियमाबाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाकरिता मा. सह दिवाणी न्यायाधीश श्रीम आदमाने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना {Anti Raging Act 1999 }बाबत माहिती दिली तसेच ऍड चांदोरकर यांनी Inrnationl Youth Day अनुषंगाने माहिती दिली तसेच ऍड हाटे यांनी World Tribal day च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना माहिती दिली सदर कार्यक्रमाकरिता हिरवळ कॉलेज मधील 100 विद्यार्थी विद्यर्थिनी व शिक्षक वर्ग उपस्थित होते मा. अपर पोलीस महासंचालक ( वा ) म.रा. मुंबई, मा. पोलीस अधीक्षक सो,म. सु. प. रायगड विभाग,मा. पोलीस उपधीक्षक सो. म. सु. प. रायगड विभाग , मा. पोलीस निरीक्षक सो., म.सु. प. रायगड विभाग, यांचे मार्गदर्शना प्रमाणे महामार्ग पोलिस मदत केंद्र महाड येथिल कार्यरत पोलिस उप निरीक्षक श्री गणेश भिलारे व पोलीस कॉन्स्टेबल बल्लाळ यांनी खालील प्रमाणे संभाव्य अपघात टाळण्या साठी घ्यावयाचे दक्षते बाबत मार्गदर्शन करून प्रबोधन,जनजागृती केली.
1) मो सायकल चालवताना नेहमी हेल्मेट चा वापर करावा.
2) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा .
3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
4) वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे
5) दारू पिवून वाहन चालवू नये.
6) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.
7) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.
8) वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.
9) विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
10) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
11) मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com