महाड शहरात भरदिवसा घरफोडी करून ६ लाख २१ हजार रुपयाची रक्कम व दागिने चोरणारी टोळी कॅमेरात कैद..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:- महाड शहरात भर दिवसा 3 अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मोठा हात मारला आहे.

मुंबई गोवा हायवे लगत हायवे प्लाझा सोसायटीतील रुम नंबर १०४ मध्ये कोणीही नसल्याची माहिती चोरट्यांना मिळाली होती.

या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख 21 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कमेची चोरी केली आहे.

या अज्ञात तीन चोरट्यांनी बंद दरवाज्याचा लॉक उचकटून घरात प्रवेश केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाला असून रूम मालक श्रीमती स्वप्नाली अनंत शिंदे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध महाड शहर पोलीस ठाणे येथे भादवि कलम 445,380,34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुर्वे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट