लातूर मध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

लातूर:– याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून तिचा खून केल्याच्या प्रकरणात मा सत्र न्यायालय लातूर यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मयत विवाहित महिला नामे जयाबाई गजानन चक्रे, रा बौद्ध नगर, लातूर हीस तिचा पती गजानन एकनाथ चक्रे व दीर संतोष एकनाथ चक्रे हे तिला विवाह पासून तू माहेरहून घर चालविण्यासाठी व घर बांधणीसाठी पैसे घेऊन ये म्हणून नेहमी मारहाण करून त्रास देत होते.

दीर संतोष चक्रे याच्या मेव्हण्याला मुलगा झाला आहे त्याला कपडे व सोने खरेदी करण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आणत नाहीस याचा राग धरून दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी राहते घरी यातील आरोपी नामे गजानन चक्रे व संतोष चक्रे यांनी मयत जयाबाई हिचे अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. त्यात जयाबाई ही 40 टक्के भाजल्याने तिचेवर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू असताना दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी ती मयत झाली होती.

          सदर प्रकरणी मयत जयाबाई हिचा भाऊ रवी सोपानराव मुळे यांचे तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 118/2021 कलम 302, 498(A), 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील यांनी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून प्रत्यक्षदर्शी व माहितगार साक्षीदार यांचे जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

         सदर प्रकरणाची सुनावणी मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश  क्र.1, श्री. आर.बी.रोटे यांचे समोर झाली. सदर प्रकरणात एकूण 09 साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या. सदरचा खून हा मयताचा लहान मुलगा याचे समोर झाल्याने त्याने तशी साक्ष न्यायालयात दिली. मुलाची जबानी ग्राह्य धरून समर्थनीय पुरावा आल्याने आरोपी नामे गजानन एकनाथ चक्रे, वय 40 वर्षे यास भारतीय दंड  संहिता कलम 302 खाली दोषी ठरवत जन्मठेप व 1000 रु. दंड, तर कलम 498(अ) खाली 2 वर्ष शिक्षा व 500 रू दंड अशी  शिक्षा  सुनावण्यात आली.  

     सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या  मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री दयानंद ह.पाटील यांनी केला, तपासात मदतनीस म्हणून पोलीस नाईक, वाजिद चिखले व पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार कोतवाड यांनी काम केले. 

पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आरोपींना समन्स/ वॉरंट बजावणी संदर्भात पाठपुरावा केला. सदर प्रकरणी मा न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती जयश्री यू. पवार यांनी काम पाहिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट