कराड पोलीस ठाण्यात एका अवैध शस्त्र बाळगणा-या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कराड: मा. पोलीस अधीक्षक सो सातारा श्री. समीर शेख यांनी संपुर्ण सातारा जिल्हयात अवैध शस्त्र, बाळगणाऱ्यांविरुध्द मोहिम तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने आज रोजी मा. श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. इसम नामे शंकर बदु जाधव रा. वाघेश्वर मसुर ता. कराड, जि. सातारा याने त्याचे ताब्यात बेकायदा बिगर परवाना बाळगलेले पिस्टल विक्रीकरीता कराड येथील हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात येणार आहे.

सदर बातमीचे अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांनी कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सदर बातमीचा आशय सांगुन मिळाले बातमीचे अनुषंगाने सापळा रचुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. पोलीस पथकाने लागलीच दोन पंच तसेच कार्यालयातील इतर स्टाफसह हॉटेल कृष्णा पॅलेस कराड या ठिकाणी दोन टिम तयार करून सापळा रचला. संशयित इसमाची चाहुल लागताच त्यास पथकातील अंमलदार यांनी जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे कमरपट्टीस पाठीमागील बाजुस एक पिस्टल व त्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत राऊंड मिळुन आले. पिस्टलची किंमत अंदाजे ५०,०००/- व जिवंत राऊंडी किंमत अंदाजे ३००/- रु. असुन ते जागीच जप्त केले आहे. इसम नामे शंकर बदु जाधव रा. वाघेश्वर मसुर ता. कराड, जि. सातारा यास पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले असुन, त्याचेविरुध्द कराड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच म.पो. का. कलम ३७ (१) ( ३ ) / १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कारवाई ही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. अमोल ठाकुर यांचे मागदर्शनाखाली वाचक पो.उ.नि.श्री.आर.पी. पुजारी, सहा.फौ. श्री. अरुण दुबळे, पोलीस अंमलदार श्री. सागर बर्गे, श्री. असिफ जमादार, श्री. प्रविण पवार, श्री. सचिन साळुंखे, श्री. सुधीर जाधव यांचे पथकाने केलेली आहे. सदर कारवाईबाबत मा. पोलीस अधीक्षक सो श्री. समीर शेख व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर यांनी श्री. अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड व कारवाई पथकातील अधिकारी अंमलदार यांचे कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट