कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत माजवुन गुन्हे करणारा धोकादायक इसम अभिनंदन रतन झेंडे याच्या विरोधात MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कराड : अभिनंदन रतन झेंडे वय ३५ वर्षे रा.शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा. याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कराड शहर स्टेशन हद्दीत राहणारा इसम अभिनंदन रतन झेंडे वय ३५ वर्षे रा. शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा. याचे विरुद्ध MPDA कायदया अन्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव श्री. भगवान रामचंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेला होता. नमूद प्रस्तावाची श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यानी पडताळणी करुन श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कराइ विभाग कराड यांचे मार्फतीने तो मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.

मा. श्री. रुपेश जयवंशी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी स्थानबद्ध इसमाने साथीदारांच्या मदतीने खुनाचा प्रयत्न, साधी व गंभीर दुखापत, शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर हत्यार चाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी मागणे, चोरी, जबरी चोरी, हद्दपार आदेशाचा उल्लंघन करणे, असे गुन्हे केलेने तसेच स्थानबद्ध इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो धोकादायक व्यक्ती झालेची खात्री झालेने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी अभिनंदन रतन झेंडे वय ३५ वर्षे रा. शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा. याचा दिनांक २७/०२/२०२३ रोजी स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश पारीत करणेत आलेले आहे.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू यांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली श्री. डॉ. रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड, श्री. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग कॅम्प कोरेगाव, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, श्री. भगवान पाटील, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस स्टेशन, अमित चावर सहा. पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस स्टेशन, पो.ना. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पो.हवा. नितीन येवळे, पो.ना, विनोद माने, पो.कॉ. प्रफुल्ल गाडे, कराड शहर पोलीस स्टेशन यांनी MPDA अंतर्गत कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.

माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये ४ मोक्का प्रस्तावामध्ये ४४ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे ०९ इसमांना हद्दपारीसारखी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इसमांवरती MPDA अंतर्गत कारवाई करुन त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुद्ध मोक्का, हद्दपारी MPDA अशा प्रकारच्या कठोर करवाया करणेत येणार आहेत.

MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेल्या इसमाचे नाव

अभिनंदन रतन झेंडे वय ३५ वर्षे रा. शाहू चौक, शनिवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट