जुहू पो. ठाणे यांनी मोबाईल स्नॅचिंग गुन्हेगाराकडुन इतर ३ पोलीस ठाणेचे गुन्हे केले उघडकीस…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई: जुहू:- ➡️ *जुहू पो. ठाणे, गुरक्र 87/2024, कलम 392,34 भादवि

➡️ उघडकीस आलेले गुन्हे :-
१) जुहू पोलीस ठाणे गुरक्र 87/2024, कलम 392,34 भादवि

२) धारावी पोलीस ठाणे गुरक्र 84/2024, कलम 379, 34 भादवि

3) काळाचौकी पोलीस ठाणे गुरक्र 27/2024, कलम 379 भादवि

4) नौपाडा पोलीस ठाणे, ठाणे गुरक्र 378/2023, कलम 379 भादवि

➡️ गुन्ह्याची हकीकत –
सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे दि 25/01/2024 रोजी रात्री 00:20 व च्या दरम्यान आय डी बी आय बँक, जलसा बंगल्यासमोरून जात असताना दोन इसम एका मोटार सायकल वरुन वेगात आले व त्यांच्या हातातुन मोबाईल जबरदस्तीने खेचून घेऊन निघून गेले.

त्यानंतर त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गाडीचा वेग जास्त असल्याने ते पळून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी जुहू पोलीस ठाणे येथे येऊन सदर अनोळखी इसमा विरोधात तक्रार दिल्यावरून त्यांचा जबाब नोंद करून गु र क्र 87/24 कलम 392,34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

➡️ चोरीस गेलेली मालमत्ता :-
1) apple कंपणीचा आयफोन 12 मोबाईल कि अ 30,000/-

➡️ हस्तगत केलेली मालमत्ता :-

1) apple कंपणीचा आयफोन 12 मोबाईल कि अ 30,000

2) काळाचौकी पोलीस ठाणे गु र क्र 27/24 कलम 379 भा द वि
मो पल्सर एन यस 200 क्र MH 01 BN 7678 अ कि रु 35,000/-(सदर डियो ही जुहू पोलीस ठाणे येथील मोबाईल स्नाचिंग च्या गुन्ह्यात वापरली आहे)

3)नौपाडा पोलीस ठाणे, ठाणे गु र क्र 27/24 कलम 379 भा द वि
मो पल्सर क्र MH 04 KM 4545 अ की रु 70,000/-
एकूण हस्तगत मालमत्तेची किंमत
01,35,000/- रुपये.

➡️ *अटक आरोपी नाव व पत्ता

1)मोहसीन लीक अन्सारी उर्फ चिकना वय 22 वर्षे रा.ठी. रूम न 1, बी न 7A, इंडियन ऑइल, म्हाडा वसाहत, गोवंडी मुंबई.

2) विधिसंघर्ष ग्रस्त बालक नामे मेहराज शहाजन शेख

➡️ * अटक दिनांक व वेळ –
दि 01/02/2024 रोजी .

➡️ गुन्हेगारी अभिलेख –

नमूद अटक आरोपीतांच्या विरुद्ध मोबाईल स्नॅचिंग चे मोबाईल चोरीचे व मोटरसायकल चोरीचे गोवंडी ट्रॉम्बे शिवाजीनगर पिंपरी चिंचवड हिंजवडी जुहू मानखुर्द टिळक नगर या पोलीस ठाणे मध्ये गुन्हे दाखल आहेत

➡️ सूचना :- नमूद अटक आरोपी यांनी अनेक ठिकाणी मोबाईल सॅचिंग सह, मोबाईल चोरीचे व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत नमूद आरोपितांचा ताबा कोणत्या पोलीस स्टेशनला पाहिजे असल्यास मा. महानगर दंडाधिकारी, १० वे, न्यायालय अंधेरी पूर्व मुंबई. येथून नमूद आरोपितांचा ताबा प्राप्त करावा.

➡️ तपास –
मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे, सपोनि धोत्रे व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तपास करत होते नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक इसम मोटरसायकलवर येऊन गळ्यातील मोबाईल खेचून जाताना दिसून आला परंतु गाडी वेगात असल्याने गाडी चा ऍलो कलर आणि मागच्याने सफेद रंगाची पॅन्ट घातलेली दिसून येत होती। पुढे कॅमेरे चेक केले असता गाडी बांद्रा मार्गे, धारावी, कुर्ला, अमर महल जनक्षण, चेंबूर रेल्वे स्टेशन नीलम जनक्षण येथे 1 आरोपी उतरला पुढे दुसरा आरोपी हा देवनार पोलीस स्टेशनहून पुढे शिवाजीनगर ब्रिज, पी एम जी पी कॉलनी, मानखुर्द रेल्वे स्टेशन मार्गे बी ये आर सी मेन गेट येथून ट्रोमबे पोलीस स्टेशन मार्गे चिंता कॅम्प येथे गेलेला दिसून आला जवळपास दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त खबरीमार्फत मिळालेल्या माहितीवरून नमूद गुन्ह्यातील संशयित इसम हा मानखुर्द रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या आरोपीस ताब्यात घेऊन त्यांस दुसऱ्या आरोपीबाबत चौकशी केल्यानंतर त्याच्या मदतीने दुसऱ्या साथीदारास पकडून पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे केलेल्या तपासा दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटकेची कारणे सांगून वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. व नमूद गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली व दुसरा आरोपी हा विधिसंघर्ष ग्रस्त बालक असल्याने त्यास डोंगरी येथे बालन्यायालयासमोर उभे करण्यात आले.

➡️ तपास मार्गदर्शन –
मा. पोलीस उप आयुक्त, श्री कृष्ण कांत उपाध्याय, परिमंडळ 9, मुंबई,
मा. सपोआ श्री महेश मुगुटराव .,
मा. वपोनि श्री सुनील जाधव
पोनि गुन्हे श्री प्रमोद कांबळे

➡️ तपासी अधिकारी –
पोनि सुनील यादव
सपोनि श्री विजय धोत्रे

➡️ *तपासी पथक :-

सपोनि श्री विजय धोत्रे
सपोनि श्री गणेश जैन
सपोउनि / तोडणकर
पो ह 32139/गजानन पाटील
पो ह 010902/ आतिष पाटील
पो ह 040435/ सिद्धप्पा टोकरे
पो ह 041174/ अमित महागडे
पो ह 040800/खोमणे
पो ह 050498/ नितीन मांडेकर
पो शि 080119/मलकप्पा कणमुसे
पो शि 090316/ तुषार पन्हाळे
पो शि 113677 /अनिल तायडे
पो शिक 141518/ प्रकाश तासगाकर

अशी माहिती वपोनि श्री सुनील जाधव
जुहू पोलीस ठाणे मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट