गोंदिया जिल्हात अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुध्द सालेकसा पोलीसांची धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- 🔹 मा. पोलीस अधिक्षक गोंदिया, अपर पोलिस अधीक्षक, यांचे मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावे असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना आदेश निर्देश सूचना दिलेल्या आहेत.
या अनुषंगाने जिल्ह्यात ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दिनांक- 7-11- 2023 रोजी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस स्टेशन सालेकसा यांचे मार्गदर्शनात अवैध धंदे करणाऱ्याविरुध्द पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे माहीतीच्या आधारे मौजा- खुळसंग टोला येथील राहणारे नामे सुजीत हरु कापसे वय 31 वर्ष याचे घराचे बाथरूम ची पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरुम मध्ये एका निळया रंगाच्या पॉलीथीन मध्ये एकुण 0.850 किलोग्रॅम वजनाचा हिरवट ओलसर उग्र वास येणारा अंमली पदार्थ गांजा किंमती अंदाजे 18,700/- रु. चा माल मिळुन आल्याने आरोपीविरुद्ध पो.स्टे. ला अप क्र.404/2023 कलम 8(क), 20(ब) एन. डी.पी.एस. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..
तसेच दुसरी कारवाई मौजा- बटटोला जंगल शिवारात आरोपी नामे- सुरेश शालीकराम मरसकोल्हे वय ३७ वर्ष रा. बटटोला ता. सालेकसा जि. गोंदिया हा मोहफुलाची हा.भ. दारु गाळतांनी मिळुन आलयाने त्याचे ताब्यातून मोहफुलाची हा.भ. दारु व हा.भ.दारु गाळण्याचे साहीत्यासह एकुण-15,200/- रु. चा जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध पो.स्टे. ला अप क्र. 405/2023 कलम 65 (ई), 66(1)(ब)(क) (ड) (फ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक , श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. अशोक बनकर, उप- विभागिय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाबासाहेब बोरसे (ठाणेदार), पोउपनि अजय पाटील, स.फौ.संजय चौबे, रामेश्वर राऊत, पो.शि. विकास वेदक, अजय इंगळे, जितेन्द्र पगरवार, मपोशि आरती आंबाडारे, यांनी कामगीरी केली आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com