तहसीलदार ऑफीस समोर उपोषण करण्याऱ्या शेतकऱ्याला कर्जत पोलीस निरीक्षकांची एक विशेष मदत…

उपसंपादक- रणजित मस्के

कर्जत: मोठ्याचे काम कोणीही करेल परंतु त्या सोबतच एखाद्या गरिबाचे काम झाले पाहिजे. तेही हक्काने पोलीस ठाण्यात आले पाहिजेत. त्यांनी हक्काने आपली तक्रार सांगितली पाहिजे आणि आपण ती सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत या तत्त्वाने पोलीस स्टेशन ला काम करत असताना बरेच अनुभव येतात त्यापैकी श्री यादवर साहेबांचा हा एक अनुभव…!
‘बावडकरपट्टी (काळेवस्ती) मिरजगाव येथे राहणाऱ्या दगडू सुदाम काळे या शेतकऱ्याची गट नं.८४/८५ मध्ये २ एकर शेतजमीन आहे.या दोन्ही गटामधून नगर-चापडगाव मिरजगाव बायपास रस्ता गेला आहे.सदर गट नं.८५ मध्ये शेतकऱ्याची ५० फूट खोल विहीर आहे.मात्र गट नं.८४ मध्ये पाईपलाईन नेण्यासाठी इतर क्षेत्रातून पाईपलाईन नेण्यासाठी भावकितील मंडळी विरोध करत होती.
तयार झालेला बायपास रस्ता खोदून पाईपलाईन नेने देखील शक्य नव्हते.रस्त्याला वळसा घालून दूर अंतरावरून पाईपलाईन नेण्यासाठी मोठा खर्च येणार होता. परंतु गरीब परिस्थितीमुळे तेही शक्य नव्हते.रस्ता ठेकेदाराकडून मदत मिळावी म्हणून या शेतकरी कुटुंबाने तहसील कार्यालयासमोर नऊ दिवस उपोषण सुरू केले होते, मात्र या गरीब शेतकऱ्याच्या आंदोलनाची कुणीही दखल घेतली नाही.
तहसील कार्यालयात कामानिमित्त गेलो असता त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली व ‘माझ्या शब्दावर उपोषण सोडायचे असेल तर सोडा, नाहीतर सोडू नका, पण मी तुमचा प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन’ यावर शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले. त्यादिवशी ठेकेदारांना फोन करून ‘संबंधित शेतकरी गरीब कुटुंबातील आहेत त्यांना शेती करण्यासाठी अडचण होत आहे.कृपया आपल्या पद्धतीने शक्य असेल तेवढी मदत केली तर बरे होईल’ अशी कैफियत मांडली. आणि यादव यांच्या फोनकॉलने शेतकऱ्याला २ लाख २० हजारांची मदत मिळाली. यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात नवचैतन्य आले.या शेतकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठून पेढे भरवून आनंद साजरा केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com