अवैध हातभट्टी दारु वाहतूक प्रकरणी दोघांना जेरबंद करून, अवैध हातभट्टी दारु निर्मितीचा अड्डड्डा स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यानी केला उध्वस्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-दोन मो.सा. हा.भ. दारू, हातभट्टी दारू, निर्मितीचे साहित्य असा किंमती- एकूण 2 लक्ष 46 हजार 420/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.. पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आले.

➖ आगामी सन उत्सव, जिल्ह्यांतील वाढती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसावा, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांच्या निर्देशांन्वये विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे…पो. नि. स्था.गु.शां. यांचे देखरेखीखाली व मार्गदर्शनात ……विशेष पथक कार्य करीत आहे.. विशेष अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी टाकून अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे निर्देश पथकास देण्यात आलेले आहेत.

➖ या अनुषंगाने विशेष पथकाने दिनांक 06/08/2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा- चुटिया येथे धाड कारवाई केली असता दोन मोटार सायकलवर मोहफुलाची हातभट्टी दारूची अवैधरित्या वाहतूक करतांना दोघांना ताब्यात घेण्यात आले… त्यांचें ताब्यातील मोटार सायकल वाहनाची झडती घेतली असता 1) टीव्हीएस Jupiter वाहनात डीक्कित एका रबरी ट्यूबमध्ये 40 लिटर, व 2) बजाज CT-100 वाहनात एका पॉलिथिन मध्ये 20 लिटर हा.भ.दारू अशी 60 लिटर हा.भ.दारू अवैधरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आहे….. त्याचप्रमाणे दुसऱ्या कारवाईत मौजा – लोधीटोला, परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू निर्मिती ठिकाणावर धाड कारवाई केली असता….हा.भ.दारू निर्मिती करतांना एकास पकडण्यात आले….. अवैध दारू निर्मिती ठिकाण, सडवा मोहफुल रसायन, उद्ध्वस्त करून नष्ट करण्यात आले असून… 40 लिटर गाळलेली हातभट्टी दारू, हा.भ. दारू निर्मितीसाठी उपयोगात येणारे जर्मन करची, टवरा, ईतर साहित्य सामुग्री असा किंमती 49,420/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.. अश्या वेगवेगळ्या दोन कारवाईत…दोन मो. सा. 100 लिटर हातभट्टी दारू, व ईतर साहित्य* असा एकूण किंमती 2 लक्ष 46 हजार, 420/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे .

सदर धाड कारवाई अवैधरित्या हाभदारू वाहतूक प्रकरणी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे आरोपी नामे –

1)अजय पन्नालाल पुराम वय 25 वर्षे राह- शहारवाणी

2) कैलाश शिवा टेंभेकर वय 43 वर्षे राह – न्यू लक्ष्मीनगर, गौतम बुद्ध वॉर्ड, गोंदिया

यांचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई), 80 नुसार तसेच

अवैधरित्या हातभट्टी मोहफुलाची दारू निर्मिती/ तयार करणारां आरोपी नामे – 3) सुधासिंधू नारायण मारस्कोल्हे वय 43 वर्षे राह- लोधीटोला/चुटीया

याचेविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब)( क)( ड)( फ)( ई), नुसार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे…

तिन्ही आरोपीतांना मुद्देमालासह गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे… पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.

▶️…… सदरची धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.नित्यानंद झा, यांच्या निर्देशांन्वये पोलीस निरीक्षक, श्री. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात विशेष पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, सुबोध बिसेन, पो. शि. छगन विठ्ठले, दुर्गेश पाटील, चालक पो . शि. नितिन चाफले यांनी कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट