बोईसर ग्रामपंचायत मध्ये घाणीचे साम्राज्य ,प्लाटिक पिशवी बंदी असूनही वापर जोरदार…

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर:– बोईसर ग्रामपंचायत ही स्वच्छ्ता अभियानात सहभागी असली तरी गावो गावी प्लास्टिक पिशविच व कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे.

बोईसर हद्दीतील नवापूर नाक्याजवल गुजराती व जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर मात्र घाणीचे साम्राज्य तयार होताना दिसत आहे. स्वच्छ अभियानात मात्र पोकळ कार्य दिसून येत आहे. नागरिक हा वसाहती पासून तर चालत्या गाडा विक्री पासून हा कर भरतो त्यातच नागरिकांचे अहवाल समोर येतच .बोईसर ग्रमपंचायतीच कारभार निस्कुळ दर्जाचे पाहण्यास येते . गेल्या 2014 पासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते मात्र बोईसर इथे स्वच्छ भारत अभियान ही रबिवण्यात हल्गळजी पना दाखवण्यात आली आहे.

बोईसर नवापूर रोड मराठी शाळा जरी बोईसर ग्रमपंचायतीच्या अंतर्गत येत असले तरी इथे कचऱ्याचे पेटी व घंटा गाडी परिसरात फिरती असली तरी मात्र ग्रमपंचायतीच दुर्लक्ष दिसुन आले.

ह्या भागात मराठी, गुजराती शाळा असल्याने मुलानच्या आरोग्याला धोका निर्मान होउ शकतो , बोईसर ग्रामपंचायत घाणीचे साम्राज्य निर्माण करु पहाते असे सांगण्यास व्यर्थ नाही
बोईसर मध्ये घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती तसेच मराठी शाळेचे मुख्यध्यापक ह्यानी शाळेच्या गेट समोर कचरा टाकू नये अस बोईसर ग्रामपंचायतीला अर्ज देऊन सुध्दा अद्याप कुठलीही कार्यवाही होत नाही , अगदी रात्रीपासून टाकलेला कचरा कुजतो त्यावर माश्या घोंगावतात डासांची पैदास होते व कुत्र्यांमुळे पसरतो कचरा तसेच मोकाट गुर कचऱ्याची नासधूस करून कचरा पसरवला जातो. अगदी पाच मिटरवर मूले शाळे मध्ये पोषण आहार खातात मुलानच्या आरोग्याच्या दूष्टीने सदर कचरा फार मोठी समस्या बनू शकतो पावसाळ्यात ही समस्या उग्र रुप धारण करु शकतो मुलाना धोका निर्मान होउ शकतो खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते.

( परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक द्दष्टिने खूप महत्वाचे आहे. या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.म्हणून परिसर स्वच्छते मध्ये लोकांनी वैयक्तिक स्वच्छते ईतकेच परिसर स्वच्छतेला महत्व दिला पाहिजे आपले घर व आपले परिसर स्वच्छ ठेवले तरच आपला आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल परिसर स्वच्छ ठेवणे जसं ग्रामपंचायतची जबाबदारी आहे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे .)

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट