आंबेत येथे विनापरवाना दारू विक्री, सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – राकेश देशमुख

आंबेत :-अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांनो सावधान राज्य उत्पादन शुल्क विभागाची तुमच्यावर नजर आहे

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार घुमू लागले आहेत. सर्वत्र आचारसंहिता लागू झाली असताना ठिकठिकाणी वेगवेगळ्या खात्याचे भरारी पथक मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहेत.

महाड राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. आंबेत येथे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. समीर यशवंत वायकर असे आरोपीचे नाव असून आंबेत येथील गणेश नगर येथे स्वतःच्या घरामध्ये 24,420 रुपयांचा दारू साठा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.

यापूर्वीही महाड राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दारू माफियांची चांगलीच झोप उडाली आहे.

रायगड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रवी कोळसे, उपनिरीक्षक शंकर जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती अपर्णा पोकळे, जवान विजय मुकादम, व त्यांचे सहकारी प्रणय हाटे व आदिनाथ चांडवीकर यांच्या टीमने छापा मारीत ही मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांनो सावधान जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे भरारी पथक कारवाई करण्यासाठी सक्रिय झाले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट