१ मे २०२५ महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन पुण्यात मोठ्या उत्साहात संपन्न

सह संपादक – रणजित मस्के
पुणे


महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार दि.१ मे २०२५ रोजी सकाळी ०८/०० वा.मा.ना.श्री. अजितदादा आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे शुभहस्ते पोलीस संचलन मैदान शिवाजीनगर, पुणे येथे ध्वजारोहण समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास मा अपर पोलीस महासंचालक (कारगृह व सुधार सेवा) महाराष्ट्र राज्य, श्री. सुहास वारके, मा.अपर पोलीस महासंचालक दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग श्री. मधुकर पांडे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा मा. विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर परीक्षेत्र श्री. सुनिल फुलारी, मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), श्री. अरविंद चावरिया, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शेलैश बलकवडे, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस अधिक्षक (पुणे ग्रामीण) श्री. पंकज देशमुख इतर विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस आयुक्तालयातील सर्व परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, विभागीय सहा. पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. सदर वेळी पुणे शहर व परिसरातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, सर्व शासकीय, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हजर होते.
सकाळी ०८/०० वा. मंत्री महोदय यांचे आगमन व स्वागत झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से), विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे तसेच मा.श्री. जितेंद्र डूडी (भा.प्र.से), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करून, मा. पालकमंत्री महोदयाकडुन पोलीस दल, गृहरक्षक दल, येरवडा कारागृह पोलीस, अग्निशामक दल, होमगार्ड नागरी सुरक्षा दल, वन विभाग या संचलन पथकाची पाहणी केली.
संचलन परेड कमांडर श्रीमती नंदिनी वग्याणी सहा. पोलीस आयुक्त, वाहतुक विभाग, पुणे शहर तसेच सेकंड इन कमांडर प्रमुख श्री. दशरथ हाटकर राखीव पोलीस निरीक्षक शिवाजीनगर मुख्यालय, पुणे यांनी केले. तसेच पथसंचलना मध्ये एकुण १२ प्लाटुन होते. त्यामध्ये पुणे शहर कडील ०२, पुणे ग्रामीण कडील ०१, पुणे लोहमार्ग ०१, पिंपरी-चिंचवड ०१, एसआरपीएफ ग्रुप नं.१ व २ यांचे कडील ०२, पुणे येरवडा कारागृहा कडील ०१, होमगार्ड यांचे कडील ०१, नागरी सुरक्षा दल यांचे कडील १ तसेच श्वान पथका कडील ऑस्कर श्वान हा परेड मध्ये सहभागी झाला होता, कॉप्स २४ चे १ पथक, वाहतुक शाखे कडील रायडर पथक, ११२ नंबर वाहन, जलद प्रतिसाद पथक, वरूण वाहन, अग्निशामक दल, शासकीय रूग्ण वाहिका अशी वाहने सहभागी झाली होती, त्याचप्रमाणे पुणे शहर, व पुणे ग्रामीण कडील वाद्यवृंद हा सहभागी झाला होता, परेड करीता २७अधिकारी व ४६३ जवानांनी भाग घेतला. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन महिला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर, सेवानिवृत्त सहा. पोलीस फौज.एस.बी. नरके (एसआरपीएफ), बल गट क्र.२, पुणे व पो.हवा. दत्तात्रय निकम यांनी केले.
मा. मंत्री महोदय यांनी उपस्थित पदाधिकारी व अधिकारी तसेच सन्माननीय नागरीकांना औपचारीक अभिवादन करून ०१ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सन २०२४ करीता मा. पोलीस महासंचालक यांचे प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील एकुण २० पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.