अवैधरित्या गावातील नदीतून वाळु चोरणारे ३ आरोपी अखेर उमदी पोलीसांच्या ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-
दि. ३०.०९.२०२३ रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील संख दुरुक्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या पांढरेवाडी या गावातील नदीपात्रातून अवैधरित्या चोरीने वाळू उपसा करणारे लोकांबाबत गोपनीय माहिती मिळाले वरून उमदी पोलीस ठाणे कडील पथकाने कारवाई करून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली व वाळू असा एकूण ५,१०,०००/- ( पाच लाख दहा हजार ) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई मध्ये मल्हारी करपे, प्रकाश करपे दोघे रा. पांढरेवाडी व सुरेश कोळी, रा. संख असे तीन इसमानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उमदी पोलीस ठाणे कडील सपोनि संदीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका कपील काळेल, पोका पोटभरे व पोका चौगूले, चालक पोका सुदर्शन खोत यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com