अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी 4 इसमांविरुद्ध. पो. ठाणे दवनीवाडा व तिरोडा येथे गुन्हे नोंद….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-3 ट्रॅक्टर- ट्रॉली, 3 ब्रास रेती असा किंमती एकूण 14 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शखा पोलीस पथकाची धडाकेबाज कारवाई…

🎯 पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी गोंदिया आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर प्रभावी धाडी घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत…. आणि यानिमित्ताने संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे…. या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे, उपविभागी य पोलीस पो. नि.श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात दिनांक.27 व 28/03/2024 रोजी अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी पो. ठाणे दवनिवाडा हद्दितील मौजा – टंकीटोली, अर्जुनी येथे व तिरोडा परीसरातील नवेझरी येथे धाड कारवाई केली असता ..अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करतांना 4 इसम हे त्यांचे ताब्यातील 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 3 ब्रास रेती (गौण खनिज) सह मिळुन आल्याने…रीतसर जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली…

सदर प्रकरणी पो. ठाणे दवनिवाडा येथे ट्रॅक्टर चालक – मालक नामे-

1) ओमप्रकाश रामचंद्र देशमुख वय 35 वर्ष,

2) सुजान अर्जुन कुसवाहा वय 28 वर्ष

3) राजेश पतीराम बावणकर वय 50 वर्ष, तिन्ही रा. अर्जुनी, ता तिरोडा, जि. गोंदिया

यांचेविरुद्ध तसेच पोलीस ठाणे तिरोडा येथे आरोपी नामे – 4) प्रमोद गोपीचंद ठवकर वय 44 वर्षे रा. मुंढरी याचे विरुद्ध कलम 379, 109 भादवी अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नमूद आरोपी याचे ताब्यातून- गौण खनिज (रेती) चोरी करीता वापरलेले 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 3 ब्रास रेती असा एकूण किंमती 14 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार स.फौ. कृपान, पो.हवा. लुटे, तुरकर, बिसेन चा.पो.हवा- बंजार यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट