माणगांव निजामपूर रोडवरील अवैध जुगार मटका किंगवर माणगांव पोलिसांचा छापा…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड

माणगांव :-माणगांव तालुक्यातील निजामपूररोड लगत असणाऱ्या नरेश साळूंखे यांच्या काळकाई इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर गाळ्याच्या लाईनमधील शांताराम बुटे यांच्या मालकीचे तीन नंबर गाळ्यामध्ये अवैध्य जुगार चालवीताना व खेळताना माणगांव पोलिसांनी रंगेहात पकडले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मयुर जनार्दन पाटील वय वर्ष २८ नोकरीं पोलीस शिपाई यांनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर देताच माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी सुमित शरद गोरेगावकर वय ३० वर्ष रा. संत रोहिदास नगर गोरेगाव ता. माणगांव, अल्पेश अशोक गायकवाड वय वर्ष ३६ रा. पळसगाव बुद्रुक ता. माणगांव, शांताराम बुटे रा. माणगांव यांच्या विरुद्ध माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. रजि. नं.२१७/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक १८८७ कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध जुगार बाळगलेल्या आरोपी यांच्याकडे चार डेल कपंनीचे कॉम्पुटर इनबील्ड सिपिनू असलेले त्यावर hh1, hh2, Hh3, Hh4 असे टँग असलेले त्यावर अनुक्रमे Gcwph32, imfph32, BrpG102,4xfph32 असा सिरीयल नंबर असलेले प्रत्येकी ५०.००० रुपये किमतीचे २ लाख किमती चे माल तसेच २५ हजार रुपये किमतीचे निळे रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल त्याचा आय एस ई आय क्र.८६२८२४०४८२८७०२३ त्यावर पी व्ही आय कंपनी चा सिमकार्ड त्यांचा मोबाईल नं.७७७६९३८२५५ व भारतीय चलनातील पाचशे च्या चार नोटा असा दोन लाख सत्तावीस हजार माणगांव पोलीसानी पकडला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पो. उप निरीक्षक गायकवाड व पोलीस नाईक फडतोडे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट